करेळमधील कासारगोड येथील रस्त्याला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचे नाव देण्यात आले आहे.
गावस्कर सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत समालोचनासाठी दुबई दौऱ्यावर आहेत.
पण नामकरण सोहळ्यासाठी गावस्कर उपस्थिती लावणार आहेत.
कालच्या भारतविरूद्ध बांगलादेश सामन्यानंतर ते आता भारतात परतणार आहेत.
ही बातमी गावस्करांना समजल्यानंतर, 'हा एक मोठा सन्मान आहे. मी त्या रस्त्यावर गाडी चालवणार आहे.' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गावस्करांनी भारतासाठी एकूण १२५ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना एकूण १०१२२ धावा केल्या आहेत.
७५ वर्षीय गावस्करांनी ३५ वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अजूनही ते अनेकांसाठी प्रेरणा आहेत.
गावस्करांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.