IND vs BAN Toss Champions Trophy 2025: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सामन्याच्या नाणेफेकीचा कौल बांगलादेशने जिंकला असून दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. कारण उपांत्यफेरीसाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे. कारण काल च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत केले व 'अ' गटाकडून उपांत्यफेरीच्या दिशेने कूच केली आहे. यानंतर भारतीय संघ पाकिस्तानविरूद्ध व न्यूझीलंडविरूद्ध दोन मोठे मुकाबले खेळणार आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्याचा दोन्ही संघ पूर्ण प्रयत्न करतील.
Pitch Report
पण दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावरील खेळपट्टी आत्तापर्यंत फलंदाजांसाठी फादेशीर ठरली आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांना ही खेळपट्टी मदत करते. या मैदानावर ३५५ धावा ही वन-डे मधील सर्वाधिक मोठी धावसंख्या आहे. त्यामुळे आज अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी व हार्दिक पांड्या या वेगवान गोलंदाजांना ही खेळपट्टी फायदेशीर ठरेल व त्यांना सुरूवातीच्या षटकांत विकेट मिळवण्याची संधी आहे. तर फिरकीपटू अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांनामात्र या खेळपट्टीवर आपले कौशल्य दाखवावे लागेल.
भारतीय प्लेईंग इलेव्हन ( India Playing XI):
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन (Bangladesh Playing XI):
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तन्झिद हसन, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, जाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, नाहिद राणा