पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपी बहाद्दरांना आणि कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील 701 परीक्षा केंद्रांवरील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख अंशी हजार मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. यापैकी राज्यातील 5130 केंद्रांपैकी 701 केंद्राचा संपूर्ण स्टाफ बदलण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मोठा निर्णय घेण्यात आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख 80 हजार मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी परीक्षा घेणारा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. राज्यातील 701 केंद्रातील संपूर्ण स्टाफ बदलणार असल्याची माहिती आहे.
पुणे – 139
नाशिक – 93
नागपूर – 86
मुंबई – 18
कोल्हापूर – 54
कोकण – 0
लातूर – 59
या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणेनागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्रची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्चला होणार आहे. परीक्षेसाठी एकूण 16,11,610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 8,64,120 मुले, 7,47,471मुली 19 ट्रान्सजेंडर आहेत. एकूण 23492 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याव्यर्थ्यांसाठी 5130 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
– फेब्रवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली असून सरल डेटावरुन माध्यमिक शाळांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक 20 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत.
– विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राहा धरावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.
– फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचे वेळापत्रक दि.21/11/2024 रोजी मंडळाच्या संकेतस्थळाबर जाहीर केले आहे.
– परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ व 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
– सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परिरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येणार आहे. परीक्षा सुरु होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. जिल्हयातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची Facial Recognition System व्दारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. Maharashtra Prevention Of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणा-यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 163 कलम लागू करण्यात येईल.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
शिक्षण कर्जाची माहिती:
शिक्षण कर्जाची गणना करा ईएमआय
अधिक पाहा..