शिक्षण होताच पीएम इंटर्नशिपची संधी, दरमहा 5000 मिळणार, 300 कंपन्यांमध्ये 1लाख युवकांना संधी
Marathi February 21, 2025 12:24 PM

<एक शीर्षक ="नवी दिल्ली" href ="https://marathi.tezzbuzz.com/topic/new-delhi" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">नवी दिल्ली: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. देशातील  738 जिल्ह्यांमध्ये 300 टॉप कंपन्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. पीएम इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 300 टॉप कंपन्यांमध्ये  1 लाख  19 हजार हून अधिक जागांवर काम करुन युवकांना प्रशिक्षण मिळेल. 

या योजनेद्वारे 21 ते 24 वर्ष वयोगटातील बेरोजगार युवकांना या योजनेत 12 मार्चपर्यंत अर्ज करता येईल. यामध्ये जिल्हा, राज्य आणि क्षेत्राच्या आधारवर तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येईल. एखाद्या उमेदवाराला एक ऑफर पसंत नसेल तर ते दुसरा अर्ज करु शकतात.दुसरी ऑफर पण ते तिसरा अर्ज करु शकतात. 

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी https:pminternship.mca.gov.in/ या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. यामध्ये अर्ज करताना कोणतीही फी द्यावी लागणार नाही. जे पूर्णवेळ नोकरी करत नाहीत तेच उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. 

पीएम इंटर्नशिप योजनेत संधी मिळण्यासाठी आणखी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे जे पूर्णवेळ शिक्षण घेत आहेत, त्यांना देखील अर्ज करता येणार नाही. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत असू नये.  या शिवाय कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. 

ऑईल , गॅस अँड एनर्जी, बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस, ट्रॅव्हल, ऑटोमोटिव्ह, मेटल अँड मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, एफएमसीजी सह रिलायन्स, एचडीएफसी, ओएनजीसी, आयशर मोटर्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी,एल अँड टी   या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करता येईल. 

दहावी पास उमेदवारांसाठी 24696, आयटीआय झालेल्यांसाठी 23629, डिप्लोमा धारकांसाठी 18589, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 15142 आणि पदवीधरांसाठी 36901 जागांवर इंटर्नशिप करता येईल. 

वर्षभर इंटर्नशिप करणाऱ्यांना दरमहा 5000 रुपये विद्यावेतनं दिलं जातं आणि एक वेळ 6000 रुपये दिले जातात. यासाठी बजेटमध्ये 840 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

भारतीय अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत आहे. विकसित देश म्हणून वाटचाल करायची असल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला प्रशिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. 2030 पर्यंत 78.5 लाख रोजगार दरवर्षी निर्माण करण्याची गरज आहे. महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या युवकांकडे आवश्यक ते कौशल्य नसतं, असं समोर आलं आहे. त्यामुळं उद्योग जगताची गरज पाहता पीएम इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली आहे. याचा पहिला टप्पा पार पडला असून दुसरा टप्पा सुरु झाला आहे.

इतर बातम्या:

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/jobs/bank-baroda-recruitment-baroda-baroda-has-started-recruitment-Process- for-4000-posts-1345371">Bank job: बँकेत नोकरी हवीय? 4000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यास सुरुवात 
& nbsp;
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/business/will-women- whow-have-ghave-gove-ge-ge-ge-get-get-benift-ladki-bahin-yojana-decision- to- घेतले-नंतर-कॅबिनेट-मिटिंग -1345342">21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार का? नेमका कधी होणार निर्णय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.