46904
कलंबिस्तमध्ये १७ जणांचे रक्तदान
‘स्वराज्य रक्षक’चा उपक्रम; मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः स्वराज्य रक्षक युवक मंडळ शिवाजी स्मारक आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव व छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून कलंबिस्त गणशेळवाडी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी १७ जणांनी शिबिरात रक्तदान केले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून व शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, माजी सरपंच अनंत सावंत, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, पोलिसपाटील प्रियांका सावंत, उद्योजक जयू गवस, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सूर्यकांत राजगे, ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. विनायक पारवे आदी उपस्थित होते.
‘ऑन कॉल’ संस्था ही गावोगावची स्थानिक मंडळे व संस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे घेऊन रक्तदानाची चळवळ गावागांवात पोहोचविण्यासाठी कार्यरत आहे, असे बाबली गवंडे यांनी सांगितले. पोलिसपाटील प्रियांका सावंत यांनी मंडळाने शिबिराला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कार्य जवळून अनुभवले आहे. रक्ताची तातडीची गरज भासली तर या संस्थेचे रक्तदाते एका कॉलवर ताबडतोब जाऊन रक्तदान करतात, हे या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी सुमित राऊळ, आत्माराम राऊळ, शैलेश सावंत, रामचंद्र सावंत, दीपक सावंत, रविकमल सावंत, शरद सावंत, संतोष सावंत, कमलाकर सावंत, करण सावंत, चेतन सावंत, सुनील तावडे, शरद सुकी, मंदार जंगम, नेल्सन रॉड्रिग्ज, अमरनाथ धुरी, नितीन सावंत, निखिल लिंगवत आदींनी रक्तदान केले. यावेळी मंडळाचे दीपक सावंत, रविकमल सावंत, प्रल्हाद तावडे, विश्वजित सावंत, रामचंद्र सावंत, रवींद्र तावडे, आनंद सावंत, माजी सैनिक संतोष सावंत, महेश सावंत, राधिका सावंत, शैलजा सावंत, आनंदी सावंत, सावंतवाडी रक्तपेढीचे अनिल खाडे, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी आदी उपस्थित होते. प्रल्हाद तावडे यांनी सूत्रसंचालन केले. रविकमल सावंत यांनी प्रास्ताविक केले. महेश रेमुळकर यांनी आभार मानले.