सध्या चांगलीच चर्चेत असेली बॉलिवूडची अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri Birthday) हिचा 23 फेब्रुवारीला वाढदिवस होता. 'ॲनिमल' चित्रपटापासून तृप्ती डिमरीला भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. तृप्ती 31 वर्षांची झाली आहे. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. तरुणाईमध्ये तृप्तीचा मोठा चाहता वर्ग आहे. ती अनेक वेळा आपल्या वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत येते.
अभिनेत्री डिमरी एका बिझनेसमनला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अशात आता तृप्तीने आपला वाढदिवस बॉयफ्रेंडसोबत साजरा केल्याचे पाहायला मिळत आहे. तृप्तीच्या बॉयफ्रेंडचे नाव सॅम (Boyfriend Sam Merchant ) आहे. त्याने इन्स्टाग्रामवर तृप्तीसाठी खास स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
बॉयफ्रेंड सॅम मर्चेंट एका स्टोरीमध्ये तृप्ती केक कापताना पाहायला मिळत आहे. तृप्तीने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. त्याने तिला खूप हटके स्टाइलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तृप्ती आजवर अनेकदा स्पॉट झाली आहे.
तृप्ती डिमरी आता लवकरच 'धडक 2'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते तिचा आगामी चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तृप्तीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 6.1 मिलियन फॉलोअर्स आहे. आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ तसेच कामासंबंधित माहिती तृप्ती येथे चाहत्यांसोबत शेअर करते.