Maharashtra Politics live: राज-उद्धव पुन्हा एकत्र; हास्यविनोद, गप्पा रंगल्या...
Sarkarnama February 24, 2025 05:45 PM
Raj Thackeray Uddhav Thackeray Met Again: ठाकरे बंधू तिसऱ्यांदा एकत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तिसऱ्यांदा रविवारी एकत्र आले.काही दिवसांपूर्वीच दादरमधील शिवसेना भवनाजवळ ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर लावण्यात आले होते. रविवारी अंधेरी येथे शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाचे लग्न होते. या सोहळ्यात राज-उद्धव, रश्मी ठाकरे आदींच्या गप्पा रंगल्या, हास्यविनोदात रमलेले दिसले.

Ladki Bahin Yojana live : लाडक्या बहिणींना आज मिळणार 1500 रुपये

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 1500 रुपये जमा होण्यास आज सुरूवात होईल. योजनेचा 8 वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं.

Neelam Gorhe live: पु्ण्यातील महिला शिवसैनिकांची आज मातोश्रीवर बैठक

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली लागली आहे. ठाकरे यांच्या पक्षात मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नव्हतं, असा गौप्यस्फोट गोऱ्हे यांनी केला आहे. त्यानंतर ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून नीलम गोऱ्हे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात शिवसेना महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर आज दुपारी 12 वाजता तातडीची बैठक आहे. पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार महिला पदाधिकाऱ्यांची बैठकीस रश्मी ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.