बदाम आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. बदाममध्ये अनेक प्रकारचे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते ज्यांच्यामुळे आपल्या आरोग्याला फायदे होतात. बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला पोषक घटक मिळतात. सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फयदे होतात. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्यानुसार, प्रत्येकाने दररोज सकाळी बदाम भिजवलेले बदाम खावेत. सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्या संबंधित अनेक समस्या दूर होतात. चला तर जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे.
अभ्यासानुसार, एक चतुर्थांश कप बदामामध्ये 6 ग्रॅम प्रथिने, 152 कॅररिज, 14 ग्राम फॅट, 6 ग्राम कार्बोहायड्रेट्स, 3 ग्राम डायटरी फायबर आणि 1 ग्राम साखर असते. तज्ञांच्या मते, बदाममध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम देखील असते ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मिळालेल्या आव्हालानुसार, तुम्ही दिवसभरामध्ये 8-10 बदाम खाऊ शकतात. बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यालाच नाही तर तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात.
तुम्ही नियमित बदामाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळण्यास मदत होते. बदाम खाल्ल्यामुळे लिपोप्रोटीन नावाच्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच लिपोप्रोटीनची पातळी वाढण्यास मदत होते. बदामामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते आणि हृदय विकाराचा धोका दूर होतो.
बदाममध्ये चांगले कॅलरीज भरपूर प्रमाणात आढळते ज्यामुळे तुमच्या शरीरातील वजन नियंत्रित राहाते आणि लठ्ठपणाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. बदाममध्ये प्रथिने आणि फायबर आढळतात ज्यामुळे तुमचे पोट नेहमी भरल्यासारखे वाटते आणि तुमच्या शरीरातील कॅलरीजची पातळी नियंत्रित राहाते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी बदामचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाण्यास मदत होते. क्यासोबतच बदममध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आमि फायबर जास्त प्रमाणात असते ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.
बदामाचे सेवन तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. बदाममध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. बदाममध्ये आढळणारे पोषक घटक तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात, त्वचा मऊ करतात आणि वृद्धत्वाची लक्षणे दूर ठेवतात. आता अनेकांना प्रश्न पडतो की बदमाचे सेवन कसे करावे? तुम्ही बदामाचे सेवन कच्चे, भिजवलेले किंवा भजून खाऊ शकतात. रात्रभर बदाम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे त्यामध्ये पोषक तत्वांची अधिक वाढ होते. त्यामुळे भिजवलेल्या बदामाचे सेवन करून तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. तुम्ही बदाम नाशत्यामध्ये, दहीमध्ये, सॅलेडमघ्ये खाऊ शकता.