'महाराजा' सिनेमातून प्रेक्षकांची पसंती मिळवलेला साउथ सुपरस्टार विजय सेतुपती. विजयने विविध सिनेमांमधून अभिनय करत लोकांचं प्रेम मिळवलंय. विजय कलाकार म्हणून ग्रेट आहे. त्याचबरोबर तो किती संवेदनशील आहे याची प्रचिती आलीय. विजयने आपल्या एका कृतीने परत एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विजयने सिने कामगारांच्या घरांसाठी १ कोटी दान करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विजयचं कौतुक होत आहे.
१ कोटी रुपये का केले दान?साउथ इंडियन मूवी वर्कर्स युनियनमधील सदस्यांसाठी विजय सेतुपतीने १ कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतलाय. विजयच्या पैशांमधून सिने कामगारांसाठी घरं बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. विजयने चेन्नईमधील फिल्म एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ साउथ इंडियाला यासाठी मदत केली आहे. सिनेमाच्या पडद्यामागील तंत्रज्ञ आणि कामगारांना राहण्यासाठी चांगली घरं निर्माण करण्यात यावी, म्हणून ही संस्था काम करते. विजयने या संस्थेला १ कोटी रुपयांची मदत केली आहे.
वृत्तानुसार विजयने एका अपार्टमेंट कॉम्लेक्सच्या निर्माणासाठी १.३० कोटी रुपये दान केलेत. या कॉम्पेक्सला विजयच्या सन्मानार्थ 'विजय सेतुपती टॉवर्स' हे नाव देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. FEFSI ही संस्था तामिळ फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील विविध भागांमधील २५ युनियनमधील २५००० कामगार आणि तंत्रज्ञांचं प्रतिनिधित्व करते. विजयच्या मदतीमुळे पडद्यामागे अहोरात्र राबणाऱ्या कामगारांना हक्काचं घर मिळणार आहे.
ट्रेंड विश्लेषक रमेश बाला यांनी X वर पोस्ट शेअर केलीय. या पोस्टनुसार, “मक्कल सेल्वन @VijaySethuOffl ने घरे बांधण्यासाठी #FEFSI चित्रपट कामगार युनियनला ₹ १.३० कोटी दान केले आहेत. अपार्टमेंट टॉवरला ‘विजय सेतुपती टॉवर्स’ म्हटलं जाईल. तामिळनाडूचे आणि अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या अलीकडच्या उपक्रमाला औदार्यता येते. यामध्ये त्यांनी अधिकृतपणे नूतनीकृत सरकारी आदेश (GO) महत्त्वाच्या उद्योग संस्थांना भाडेतत्त्वावर जमीन सुपूर्द केलीय. FEFSI यामध्ये तमिळ निर्माता परिषद, दक्षिण भारतीय कलाकार संघटना आणि तमिळनाडू स्मॉल स्क्रीन आर्टिस्ट असोसिएशन यांचा समावेश आहे.