'छावा' (Chhaava ) चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने काही दिवसातच आपले बजेट देखील वसूल केले आहे. छावा चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विकी कौशल (vicky kaushal), महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला आहे.
'' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये
दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये
तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये
चौथा दिवस - 24 कोटी रुपये
पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये
सहावा दिवस - 32 कोटी रुपये
सातवा दिवस - 21.5 कोटी रुपये
आठवा दिवस - 23 कोटी रुपये
नववा दिवस - 45 कोटी रुपये
दहावा दिवस - 40 कोटी रुपये
एकूण कलेक्शन - 326.75 कोटी रुपये
'छावा' चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता हा चित्रपट लवकरच 500 कोटींचा व्यवसाय करणार आहे. 'छावा'चे तगडे प्रमोशन करण्यात आले होते. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. 'छावा' चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. 'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे. छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 5 कोटी कमावले होते. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने अजय देवगणच्या 'तानाजी' चित्रपटाला मागे टाकले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामुळे विकीच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. 'छावा' चित्रपटातील विकीच्या अभिनयाचे चाहते दिवाने झाले आहेत.