टीम इंडियाने रविवारी 23 फेब्रुवारीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पाकिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाने विराट कोहली याच्या नाबाद शतकाच्या जोरावर 242 धावांचं आव्हान हे 43 व्या ओव्हरआधीच 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा दुबईतील एकदिवसीय क्रिकेटमधील सातवा विजय ठरला. तसेच भारतीय संघाने यासह चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरुद्ध विजयाबाबात बरोबरी साधली. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सहापैकी तिसरा विजय ठरला. टीम इंडियाला या विजयानंतर आयसीसीकडून आनंदाची बातमी मिळाली आहे.
टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. टीम इंडियाने पाकिस्तानआधी बांगलादेशचा धुव्वा उडवला. रविवारी विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली. टीम इंडियाने न्यूझीलंडला पछाडत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. टीम इंडियाचे 4 पॉइंट्स आहेत. तर भारताचा नेट रनरेट हा 0.647 असा आहे, जो सामन्याआधी 0.408 असा होता. तर न्यूझीलंडचा नेट रन रेट हा 1.200 असा आहे.
बांगलादेशने खेळलेला एकमेव सामना गमावलाय. भारताने बांगलादेशला 20 फेब्रुवारीला पराभूत केलं. बांगलादेशचा नेट रन रेट हा 0.408असा आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची बांगलादेशपेक्षा वाईट स्थिती आहे. पाकिस्तानने खेळलेले दोन्ही सामने गमावलेत. पाकिस्तानसाचा नेट रन रेट हा इंडियाविरुद्धच्या सामन्याआधी -1.200 असा होता, जो पराभवानंतर -1.87 असा झाला आहे. पाकिस्तान ए ग्रुपमध्ये सर्वात शेवटी चौथ्या तर बांगलादेश तिसऱ्या स्थानी आहे.
पाकिस्तानचा धुव्वा उडवताच टीम इंडिया नंबर 1
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.