सत्यम प्रभाग संघाची बांद्यात वार्षिक सभा
esakal February 24, 2025 09:45 PM

47355

सत्यम प्रभाग संघाची
बांद्यात वार्षिक सभा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः बांदा सत्यम प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील आनंदी मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी या प्रभाग संघाच्या २३४ महिला सदस्य उपस्थित होत्या.
व्यासपीठावर बँक ऑफ इंडियाचे बांदा शाखा व्यवस्थापक पवन कुलकर्णी, सावंतवाडी महिला समुपदेशन केंद्राच्या तृप्ती धुरी, सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्गच्या मीनाक्षी नाईक, जिल्हा महिला व बाल विकास केंद्र सिंधुदुर्गचे नंदकिशोर फोंडेकर, गिरिजा मेटर, प्राची राऊळ, तालुका व्यवस्थापक शिवानंद गवंडे, स्वाती रेडकर, रीधिमा पाटकर, सत्यम प्रभागसंघ अध्यक्ष वैशाली पै, कोषाध्यक्ष दीप्ती कदम, सचिव हर्षदा गवस, आरोंदा प्रभाग समन्वयक श्री. पावरा, मळेवाड प्रभाग समन्वयक श्री. राठोड आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रभागातील सर्व ‘सीआरपी’ व अन्य सर्व केडर, समूहातील महिला उपस्थित होत्या. सत्यम प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बांदा प्रभागसंघ व्यवस्थापक शिल्पा सावंत व प्रभाग समन्वयक कुवरसिंग पाडवी यांच्या नियोजनखाली झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.