भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरोधात शानदार नाबाद शतक झळकावलं, विराट कोहलीच्या खेळाच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला लोळवत हा सामना सहा विकेटने जिंकला. या सामन्यात विराटने 111 चेंडूंचा सामना करताना नाबाद 100 धावा केल्या, विराट कोहलीच्या 100 धावांच्या बळावर भारतानं 242 धावांचं टार्गेट सहज पूर्ण केलं. भारतानं सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने आपल्या या ऐतिहासिक खेळीबद्दल बोलताना मोठा खुलासा केला आहे, यावेळी बोलताना त्याने आपल्या सर्वात मोठ्या कमजोरीचा देखील खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या समस्येमुळे आपण परेशान असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
विराट कोहलीने सांगितली आपली कमजोरी
यावेळी बोलताना विराट कोहलीने कबुलीच दिली आहे, की त्याचा ट्रेडमार्क असलेला कव्हर ड्राईव्ह खेळताना आता त्याला समस्या येत आहे. अलिकडच्या काळात तीच माझी मोठी कमजोरी झाल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. मात्र या शॉटमुळेच मी माझ्या डावावर नियंत्रण मिळू शकतो असंही विराट कोहलीने म्हटलं आहे. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्याने म्हटलं आहे की, ही एक कठीण परिस्थिती आहे, मी एका कठीण परिस्थितीमधून जात आहे. गेल्या काही वर्षांपासून कव्हर ड्राईव्ह ही माझी कमजोरी राहिली आहे. मात्र याच शॉटवर मी खूप धावा देखील बनवल्या आहेत. मला वाटतं हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मी सुरुवातीला जोखीम पत्कारून दोन कव्हर ड्राईव्ह मारले, मला तो धोका पत्कारावा लागला, मात्र त्यानंतर मी माझ्या खेळावर नियंत्रण मिळवले, आणि मी शतक देखील झळकावलं.
विराट कोहलीने पुढे बोलताना म्हटलं की जेव्हा- जेव्हा मी हा शॉट खेळतो, तेव्हा तेव्हा मी फलंदाजी करताना स्वत:ला सुरक्षित समजतो. त्यामुळे हा शॉट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. जेव्हा -जेव्हा मी पाकिस्तानसोबत मॅच खेळतो तेव्हा -तेव्हा मला या शॉटची मोठी मदत होते. या मॅचमध्ये एक वेगळंच दडपण असतं, मात्र मी जेव्हा – जेव्हा जोखीम घेऊन कव्हर ड्राईव्ह खेळतो, तेव्हा मला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो, त्याचा रिझल्ट तुम्ही या सामन्यात पाहिलाच आहे, असं विराटने म्हटलं आहे.