शिखर धवन भारत पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला.त्याला संघाकडून सर्वोत्तम क्षेत्ररक्षण खेळाडूला पुरस्कार देण्याकरिता बोलावले होते. ज्या खेळाडूने सामन्यात क्षेत्ररक्षण करताना महत्त्वाचे योगदान दिले होते, त्या खेळाडूला पुरस्कार देण्यात येणार होता. शिखर धवन जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये आला त्यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली आणि अन्य सर्व खेळाडू त्याला पाहून खूप आनंदी झाले.
भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी संघासमोर सर्वोत्तम क्षेत्ररक्षण पुरस्कार देण्यासाठी खेळाडूंची नावे घेतली. त्यामध्ये त्यांनी केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि अन्य चार खेळाडूंची नावे घेतली.
हा खास पुरस्कार देण्यासाठी भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा ब्रँड अँबेसिडर शिखर धवन ड्रेसिंग रूममध्ये आला. शिखरने विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक केले. तसेच संपूर्ण संघाला पाकिस्तान विरुद्धच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
शिखर धवनने पाकिस्तान विरुद्ध सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण पुरस्कार प्रदान करताना अक्षर पटेलचे नाव घोषित केले. अक्षर पटेलला त्याने मेडल घातले. तसेच अक्षर पटेलने शानदार गोलंदाजी करताना सलामीवीर इमाम उलहकला धावबाद केले होते. याशिवाय त्याने सौद शकीलचा कॅच पकडला होता.
अक्षर पटेलच्या गोलंदाजी बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने मोहम्मद रिजवानला क्लीन बोल्ड बाद केले . अक्षर हा एकमात्र गोलंदाज होता ज्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांमध्ये पूर्ण 10 षटकार गोलंदाजी केली. त्यामध्ये त्याने 49 धावा देऊन 1 विकेट घेतली.
चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतीय संघाने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाला 6 विकेट्सने हरवत चांगलाच धुवा उडवला. भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना 242 धावा 43 व्या षटकातच पूर्ण केल्या. विराट कोहलीने शेवटचा चौकार मारत संघाला विजय मिळवून देत त्याचं 82 व आंतरराष्ट्रीय शतकही पूर्ण केलं.
त्याआधी भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. फिरकीपटू कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या. अष्टपैलू हार्दिक पांड्याने बाबर आझम सोबत अजून एक विकेट घेतली. दुसरी विकेट त्याने सौद शकीलची घेतली होती. त्यानेच पाकिस्तान संघासाठी सर्वात जास्त धावा केल्या होत्या.
हेही वाचा
दुबईत भारतीय संघाला धक्का, पाकिस्तानचा मोठा विजय ,बाबर-रिझवान चमकले
पाकिस्तानच्या आशा भंगल्या! बांग्लादेशची सुमार कामगिरी, फक्त 236 धावा
22 पंडित आणि जादूटोण्याने पाकिस्तानचा पराभव? भारतावर आरोप करत, पाक मीडियाच्या हास्यास्पद दावा