पारध : पारध (ता. भोकरदन )येथील एका महिलेच्या जमिनीचा फेरफार करण्यासाठी पारध सजाचे ग्राम महसूल अधिकारी अभय मधुकरराव कुलकर्णी यांनी संबंधित महीले कडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.मात्र रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून या संदर्भात तक्रार केली होती.
दरम्यान सोमवारी (ता. 24)लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बी.एम. जाधवर,पोलीस अंमलदार भालचंद्र बिनोरकर ,गणेश चेके ,अशोक राऊत यांनी सकाळी पारध तलाठी कार्यालयात सापळा रचून तडजोडी अंती ठरलेली लाच रक्कम रुपये २५००/- रुपये स्विकारताना ग्राम महसूल अधिकारी अभय कुलकर्णी यांचा खाजगी दलाल कृष्णा गणेश दळवी (रा.येवता,ता. जाफराबाद) याच्या मार्फत स्विकारताना रंगेहाथ पकडले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,पारध येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आईने खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करायचा म्हणून ग्राम महसूल अधिकारी अभय कुलकर्णी यांच्याकडे विनंती केली.मात्र या कामासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केली.तडजोडी अंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले .ती लाचेची रक्कम स्विकारताना अभय कुलकर्णी यांनी ठेवलेला खाजगी दलाल कृष्णा दळवी यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जाळ्यात ओढले.असून, अभय कुलकर्णी हा मात्र फरारी झाला आहे. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
ग्राम महसूल अधिकारी अभय कुलकर्णी यांच्यावर यापूर्वीही एसीबीची कारवाई झालेली. असून,ही दुसरी कारवाई आहे, त्यांनी त्यांच्या नौकरीच्या काळात मोठया प्रमाणात आर्थिक माया जमवलेली आहे. तर अनेक ठिकाणी घरे, जमिनी, कॉम्पलेक्स असल्याचे समजते. एसीबीच्या पथकाने त्यांच्या भोकरदन येथील घरी भेट दिली असता, तो मिळून आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.