AI च्या वादळाने आयटी क्षेत्राची उडवली झोप; सीएलएसएच्या 'या' अहवालामुळे गुंतवणूकदार घेणार का मोकळा श्वास?
IT Sector India : जागतिक ब्रोकरेज फर्म CLSA ने भारतीय आयटी क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टिकोन राखला आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, जनरेटिव्ह एआय आणि बीएफएसआय क्षेत्रातील सुधारणांमुळे येत्या काळात भारतीय आयटी कंपन्यांना मजबूत वाढ मिळेल असा विश्वास कंपनीला आहे. सीएलएसए अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारतीय आयटी क्षेत्रासाठी अनेक सकारात्मक चिन्हे आहेत. ज्यामुळे वाढीला गती मिळेल. यामध्ये बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्रातील ताकद, दूरसंचार उद्योगातील व्यवहार आणि कस्टम एआय सोल्यूशन्सचा वाढता वापर यांचा समावेश आहे. जनरेटिव्ह एआय महसूलाचे मोठे साधनसीएलएसएच्या मते, जनरेटिव्ह एआय भविष्यात भारतीय आयटी कंपन्यांसाठी एक प्रमुख उत्पन्न स्रोत बनू शकते. मोठ्या भाषा मॉडेल्स (LLM) चे कमोडिटायझेशन आयटी कंपन्यांना कस्टम एआय एजंट विकसित करण्याची संधी देईल, ज्यामुळे क्लायंटकडून मागणी वाढू शकते. मागणी पुनरुज्जीवनामुळे बीएफएसआय क्षेत्र वाढीच्या मार्गावर आहे. ग्राहक पुन्हा आयटी कंपन्यांना नवीन प्रकल्प देत आहेत. दूरसंचार क्षेत्रात आव्हाने कायमक्षेत्रीय निर्देशक कमकुवत असूनही दूरसंचार उद्योगात खर्च-केंद्रित व्यवहार होत आहेत. तसेच, कंपन्या कमी किमतीत प्रकल्प घेण्याचा प्रयत्न करत असल्याने डील किंमतीवरील दबाव वाढू शकतो. सीएलएसए म्हणते की ईपीएएम आणि ग्लोबंट सारख्या उत्पादन-केंद्रित कंपन्यांनी मजबूत मार्गदर्शन केले आहे, जे भारतीय आयटी कंपन्यांसाठी देखील एक सकारात्मक संकेत आहे. निफ्टी आयटी निर्देशांकात घसरणभारतीय शेअर बाजाराच्या घसरणीमध्ये निफ्टी आयटी निर्देशांकालाही मोठा फटका बसला आहे. गेल्या सहा महिन्यात निर्देशांक ५ टक्क्यांनी घसरला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये निफ्टी आयटी निर्देशांक ४५९९५ अंकांच्या पातळीवर होता तर आज तो ३९४४६ अंकांवर आहे.