IND vs PAK : पुन्हा येणार भारत पाकिस्तान आमनेसामने, पण कधी आणि केव्हा? ते जाणून घ्या
GH News February 25, 2025 06:10 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतच भारताने पाकिस्तानचा वचपा काढला. 2017 च्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला 180 धावांनी पराभूत केलं होतं. त्याचा वचपा काढत भारताने पाकिस्तानला साखळी फेरीतूनच आऊट केलं आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हा सामना पुन्हा पाहण्याची संधी या स्पर्धेत तरी येणार नाही. मग हे दोन संघ आता कधी आमनेसामने येतील असा प्रश्न आहे. तर हे दोन संघ आता आशिया कप स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतील. आशिया कप स्पर्धा 2025 या वर्षाच्या शेवटी सुरु होईल आणि 2026 च्या सुरुवातीला संपेल. या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असून भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येतील. 2026 टी20 वर्ल्डकपपूर्वी या स्पर्धेचं प्रारुप हे टी20 फॉर्मेटमध्ये असेल. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि युएई हे संघ आहेत.

आशिया कप 2025-26 ही स्पर्धा दोन गटात विभागली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरीत दोन सामने खेळेल. प्रत्येक गटात दोन संघ अव्वल असतील त्याने पुढची संधी मिळेल. त्यानंतर अव्वल चार सुपर 4 फेरीत जागा मिळवतील. अ गटात भारत, पाकिस्तान आणि युएई, तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश हे संघ असतील. यामुळे या टप्प्यातही भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येतील. सुपर 4 मधील अव्वल दोन संघ अंतिम फेरी गाठतील. त्यामुळे अंतिम फेरीतही भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे या वर्षाअखेरीस क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान असे तीन सामने पाहण्याची संधी मिळू शकते.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रोहित शर्माच्या वनडे क्रिकेट कारकिर्दिची शेवटची स्पर्धा असू शकते. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघ आता वनडे कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर टाकेल याबाबत चर्चा सुरु आहे. पण अजूनतरी याबाबत काही स्पष्ट नाही. पण रोहित शर्माचं वय आणि 2027 वनडे वर्ल्डकपची तयारी पाहता ही संधी दुसऱ्या खेळाडूला मिळणार यात काही शंका नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.