5.1 Magnitude Earthquake Strikes Bay of Bengal : मंगळवारी सकाळी पश्चिम बंगालमधील काही भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागरात असल्याची माहिती आहे. सकाळी ६.१० वाजता दरम्यान ही भूकंपाची घटना घडली.
या भूकंपात कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झाली नसली तरी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भूकंपाचा धक्का बसला तेव्हा अनेक जाण झोपेत होते. मात्र, धक्का जाणवताच अनेकांनी घराबाहेर धाव घेतली होती. या भूकंपाचे धक्के पश्चिम बंगालबरोबरच ओडिशातील काही भागातही जाणवले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात दिल्ली, ओडिशा, बिहार आणि सिक्कीम या चार राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्लीत भूकंपाचा केंद्रबिंदू धौला कुआ येथे ५ किलोमीटर खोलीवर असल्याने राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. तसेच या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल मोजण्यात आली होती.
याशिवाय बिहारमधील भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी होती. सिवान हे त्याचे केंद्र होते. तसेच ओडिशातील पुरी येथेही ४.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले होते. याशिवाय सिक्किमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याचे समोर आले होतं. भूकंपानंतर पंतप्रधान मोदींनी सर्वांना शांत, सुरक्षित आणि सतर्क राहण्याचे आवाहन केलं होतं.