चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेची चिंता वाढली! उपांत्य फेरीचं गणित फिस्कटणार?
GH News February 25, 2025 07:12 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ब गटात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिाक यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या दृष्टीने हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. जिंकणारा संघ थेटच उपांत्य फेरी गाठणार आहे. अशी स्थिती असताना या सामन्यात वरुण राजाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ब गटातील उपांत्य फेरीचं गणित किचकट होणार आहे. दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी साखळी फेरीतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्याचा दोन्ही संघांचा मानस आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना होणार की नाही अशी शंका आहे. अजूनही या दोन्ही संघात नाणेफेकीचा कौल झालेला नाही. वेळापत्रकानुसार, या दोन्ही संघांमधील सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजता होणार होता आणि सामना दुपारी 2:30 वाजता सुरू होणार होता. पण रावळपिंडीमध्ये पावसामुळे अद्याप नाणेफेकही झालेली नाही. यामुळे दोन्ही संघांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात हे संग पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. या सुपरहिट सामन्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण पावसामुळे नाणेफेक होऊ शकली नाही म्हणून चाहते निराश झाले आहे. दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. हा सामना जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यामुळे दोन्ही संघांचे उपांत्य फेरीचे गणित बिघडेल. उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल तर दोन्ही संघांवर त्यांचा पुढचा सामना जिंकण्याचे दडपण असेल. त्यामुळे हा सामना व्हावा अशी दोन्ही संघाच्या चाहत्यांची इच्छा आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स कॅरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघ, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झांपा.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्जी, मार्को जॅन्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॉस व्हॅन डेर ड्यूसेन, कॉर्बिन बॉश.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.