Govinda Divorce : 37 वर्षांनी गोविंदापासून सुनीता आहुजा घेणार फारकत ? मराठी अभिनेत्रीबरोबर अफेअरची चर्चा
esakal February 25, 2025 09:45 PM

Bollywood Entertainment News : अभिनेता आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहेत. काही बातम्यांनुसार गोविंदा आणि सुनीता यांचा घटस्फोट होणार असून या प्रकरणाचा शेवटचा टप्पा सूर आहे. त्यांच्या लग्नाला 37 वर्षं पूर्ण झाली आहेत. अनेक मुलाखतींमध्ये सुनीता यांनी गोविंदा त्यांच्याबरोबर राहत नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या चर्चांनी आणखी जोर पकडला आहे.

गेल्या काही काळापासून गोविंदा, आणि त्यांची मुलगी टीना विविध माध्यमांना मुलाखती देत आहेत. याचदरम्यान सुनीता यांनी अनेकदा त्यांच्या आणि गोविंदाच्या पर्सनल लाईफवर भाष्य केलं. अनेकदा मस्करीत गोविंदाच्या अफेअर्सविषयी खुलासा केला. त्यावरूनच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चानी जोर धरला आहे.

काही चर्चांनुसार गोविंदाचं एका तीस वर्षीय मराठी अभिनेत्रीबरोबर अफेअर सुरु आहे. यामुळे त्याचं कुटूंब नाराज असून ते त्याच्यापासून वेगळे राहत आहेत. दरम्यान, या चर्चांबद्दल कोणीही अजून अधिकृतरीत्या भाष्य केलं नाहीये.

रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये अनेक दावे करण्यात आले आहेत. तसंच गोविंदाला जेव्हा गोळी लागली तेव्हाच सुनीता आणि तो एकत्र राहत नसल्याचं समोर आलं होतं. याच कारण सुनीताने गोविंदाचं बिझी शेड्युल असल्याचं सांगितलं होतं पण युझर्सनी मात्र आता कमेंट्सच्या माध्यमातून अनेक मतं मांडली आहेत.

"अनेक मुलाखतींमध्ये सुनीताने गोविंदाचं अफेअर सुरु असल्याची हिंट दिली आहे. गोविंदा सुनीताच्या फ्लॅट समोर असलेल्या बंगल्यात राहतो कारण त्यांचं शेड्युल मॅच करत नाही. ज्याचे इतके अफेअर्स पकडले अशा माणसाबरोबर राहणं किती तणावपूर्ण असेल ? जिने त्याच्या आईची आणि संपूर्ण कुटूंबाची काळजी घेतली तिला म्हातारपणी सोडलं." तर एकाने लिहिलाय कि,"आता समजलं गोळी का लागली ? सुनीताने त्यांना रंगेहाथ पकडलं असणार."

11 मार्च 1987 मध्ये सुनीता आणि गोविंदाने लग्न केलं. त्यावेळी सुनीता फक्त 18 वर्षांची होती तर गोविंदाचं वय 24 होतं. त्या दोघांना यशवर्धन आणि टीना ही दोन मुलं आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.