आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे जगभरात लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. लठ्ठपणामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. भारतामध्ये कमी वयामध्ये अनेक मुलं लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा वाढल्यामुळे तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या होऊ शकतात. भरातात लठ्ठपणाच्या समस्या टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणाविरुद्ध मोहीमही सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी मनु भाकर, ओमर अब्दुल्ला आणि आर माधवन यांची भेट घेतली. लठ्ठपणा विरूद्ध लढाईसाठी माधवनसह 10 जणांना नामंकन देण्यात आले आहे.
एवढेच नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या जेवणामध्ये कमीत कमी तेलाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. जेवणामध्ये तेलाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित अनेक समस्या होऊ शकतात. तज्ञांच्या मते, तुमच्या पोटातील चरबी वाढल्यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, शरीरातील चयापचय वाढवणारे अनेक पेये आहेत. या पेयांचे सेवन केल्यास चरबी वितळते. चला तर मग जाणून घेऊया लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणते पेय फायदेशीर ठरतात.
आवळा रस – आवळ्याच्या रसात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील चयापचय वाढवते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. आवळ्याचा रस प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगाने वाढते.
जिरे पाणी – पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी जिरे पाणी खूप फायदेशीर आहे. जिरे पाणी शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते आणि पोटाच्या समस्या देखील दूर करते. यासाठी, रात्रभर पाण्यात एक चमचा जिरे भिजवा, नंतर सकाळी ते उकळवा, पाणी गाळून प्या.
ग्रीन टी- ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असते ज्यामुळे शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रात्री जेवणाच्या अर्धा तासानंतर ग्रीन टी पिऊ शकता. यामुळे चयापचय मजबूत होतो.
बडीशेप पाणी – एका ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप घाला आणि ते पाणी उकळा. पाणी चांगले उकळल्यानंतर थंड झाल्यावर प्या. तज्ञ म्हणतात की बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. याशिवाय, बडीशेपचे पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी या गोष्टी करा…
सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये मध मिसळून प्या. सकाळी नियमित व्यायाम आणि योगा केल्यामुळे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. तुमच्या जेवणामध्ये फॅट्स असलेल्या पदार्थाचं सेवन करणं टाळा त्याऐवजी प्रोटिनची मात्रा वापरा. वजन कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी प्या. वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 2-3 तास जेवण करा.