दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिके अव्वल स्थानी झेप घेतली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात जायंट्सला मोठी धावसंख्या करण्याचं आव्हान होतं. पण गुजरातचा डाव सुरुवातीलाच अडखळला. गुजरात जायंट्सला 20 षटकात 9 गडी गमवून कशाबशा 127 धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर अवघ्या 128 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सोपं आव्हान असल्याने सहज विजय मिळेल असा अंदाज क्रीडाप्रेमींना होता आणि झालंही तसंच..कर्णधार मेग लेनिंग फक्त 3 धावा करून बाद झाली त्यामुळे सामना तूल्यबळ होती की काय अशीही शंका आली. पण शफाली वर्मा आणि जेस जोनासेन जोडीने गुजरातच्या गोलंदाजांचा हा हेतू हाणून पाडला. दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. शफाली वर्मा 27 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 44 धावा करून बाद झाली.
शफाली वर्मा बाद झाल्यानंतर जेस जोनासेन आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी मोर्चा सांभाळला. खरं तर एका बाजूने जेसने आक्रमक खेळी करत संघावरच दडपण प्रत्येक चेंडूला कमी करता होती. जेसने 27 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. संघाला 45 चेंडूत फक्त 14 धावांची गरज होती. तेव्हा जेमिमा चुकीचा फटका मारून बाद झाली. तिने 9 चेंडूत फक्त 5 धावा केल्या. तिथपर्यंत सामना दिल्लीच्या पारड्यात झुकला होता. दरम्यान, गुजरात जायंट्सला पराभूत करताच दिल्लीचे एकूण 6 गुण झाले आहेत. त्यामुळे थेट चौथ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. आता दिल्लीला विजयी घोडदौड कायम ठेवणं महत्त्वाचं आहे. यापूर्वी दिल्लीने दोन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली आहे.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, ॲशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, भारती फुलमाली, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मेघना सिंग.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, शिखा पांडे, तितस साधू, मिन्नू मणी.