राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महागाई भत्त्यात तब्बल ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची होळीआधीच दिवाळी झाली आहे.
राज्य सरकारच्या भत्यात वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात थकबाकीसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार, १ जुलै २०२४ पासून सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर ५० वरून ५३ टक्के करण्यात आला आहे.
महागाई भत्त्याचा कालावधी १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ असा असेल. या कालावधीतील रक्कम थकबाकीसह फेब्रुवारी 2025 च्या वेतानासह रोखीने देण्याचा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारी होळीआधीच दिवाळीचं गिफ्ट मिळालं आहे. s