जर तुम्हाला केवळ एका जागी राहून ३० कोटी रुपयांचा पगार कोणी देत असेल तर तुम्ही म्हणाल काय मस्करी करता राव, कोणी एका ठिकाणी राहायचे इतके वेतन देईल काय ? जगात काही रहस्यमय ठिकाणांचे रहस्य आज देखील कायम आहे. आज आपण या जागेसंदर्भात वाचणार आहोत तेथे नोकरी करणाऱ्याला केवळी स्विच ऑन आणि ऑफ करायचे तीस कोटी दिले जातात…. ही जागा एक लाईटहाऊस आहे. हे काही साधारण लाईट हाऊस नाही. हे लाईट हाऊस वास्तू कलेचा उत्तम नमूना आहे. ज्यांना रोमान्स आणि साहसपूर्ण जीवन पसंद आहे. त्यांच्यासाठी हे ठिकाण स्वर्गाहून कमी नाही. परंतू येथे पोहचणे फार कमी लोकांना शक्य असते. अखेर इतका पगार आणि सोयी सुविधा असतानाही ही जगातील सर्वात कठीण नोकरी मानली जाते. चला तर पाहूयात काय आहे ही बातमी …
प्रसिद्ध नौदल कॅप्टन मॉरिशियस यांना एकदा इजिप्तच्या के अलेक्जेंड्रिया जवळ भयंकर वादळाचा सामना करावा लागतो. या ठिकाणी मोठ्या खडकांमुळे मॉरिशसच्या जहाजाचे मोठे नुकसान होते.या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी जहाजांसाठी ‘लाईट हाऊस‘ उभारण्याची गरज आहे हे स्पष्ट होत. तत्कालिन सरकारने एका प्रसिद्ध वास्तूकारांना बोलवते आणि समुद्रामध्ये या लाईट हाऊस उभारण्याचे सांगते.या खडकांपासून जहाजाचा बचाव करण्यासाठी येथे लाईट हाऊस उभारण्यात येते.
इजिप्तच्या के.अलेक्झाड्रीयात फरोस बेटावर या द्वीपसमुहाची उभारणी होते. या द्वीप समुहाला ‘द फरोस ऑफ अलेक्झाड्रिया’ नावाने ओळखले जाते. या लाईट हाऊसला वास्तूकलेचा उत्तम नमुना मानला जातो.या लाईट हाऊसमध्ये एवढी मोठी आग जाळली जाते त्याचा प्रकाश लांबूनही दिसते. हा प्रकाश विशेष लेन्सच्या मदतीने आणखी दूरवरुन दिसतो.
जहाज रस्ता चुकु नये म्हणून लाईटहाऊसचा वापर व्हायचा, आधी हे समुद्राच्या किनाऱ्यावर बांधले जात होते. आता समुद्राच्या आत देखील उभारतात. तेथे पाणी उथळ असते. खडक देखील जास्त असतात. वीजेच्या शोधानंतर या लाईट हाऊसमध्ये विजेचे बल्ब लावले जातात. त्यामुळे याची कार्यक्षमता वाढली.लाईट हाऊसच्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीला या लाईट हाऊसला नेहमीच प्रज्वलित केले पाहीजे. हा लाईट हाऊस एवढ्या कठीण जागी उभारलेले आहे. येथे जाऊन याची निर्मिती 284-246 इसवी सना पूर्वी केली. आज देखील या जागेला आव्हानात्मक मानले जाते. आजही येथे पोहचणे अवघड आहे. यामुळे प्राचीन काळात याला जगातील सात आश्चर्यापैकी एक मानले जात होते.
या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला या कठीण क्षेत्रात राहावे लागते. या दीपगृहाला अनेकदा तीव्र वादळांचा तडाखा बसतो. हे लाईट हाऊस नेहमी प्रज्वलित ठेवावे लागत आहे. या भागात समुद्राच्या प्रचंड लाटा येत राहतात, ज्या सतत या दीपगृहावर आदळतात. कधीकधी, हे दीपगृह अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडालेले असते. त्यामुळे या कठीण प्रसंगात तग धरण्यासाठी येथील नोकरी करणाऱ्या ३० कोटी रुपयांचे वेतन दिले जात आहे. परंतू इतक्या प्रतिकूल परिसरात एकटे रहावे लागत असल्याने ही नोकरी ३० कोटी रुपये पगार देऊनही नोकरी करायला कोणी तयार नाही.