संतोष देशमुख खूनप्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय देशमुख यांना फोन करत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच, तब्येतीची काळजी घ्यावी, अशी विनंतीही केली आहे. दरम्यान, आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोगला जाऊन धनंजय देशमुखांची भेट घेतली आहे.
Praniti Shinde : पाणी प्रश्नावर खासदार प्रणिती शिंदेंकडून नवीन योजना जाहीरसोलापूर लोकसभा मतदारसंघातील चार गावांतील पाण्याच्या प्रश्नासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. लोकचळवळीतून ही योजना सुरू करणार आहोत.
Sand Policy : राज्याचे नवीन वाळूधोरण लवकरच ठरणार; शुक्रवारी अंतिम सादरीकरण होणारराज्याचे नवीन वाळू धोरण ठरविण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत येत्या 28 फेब्रुवारी रोजी अंतिम सादरीकरण करण्यात येणार आहे. राज्यातून मागविण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर चर्चा होणार आहे. नव्या वाळू धोरणात नव्या 167 सुधारणा विचारात घेतल्या जाणार आहेत.
Indrajit Sawant : इंद्रजित सावंतांच्या धमकीची देवेंद्र फडणवीसांनी घेतली दखलइतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.सावंत यांनी त्या धमकीचे रेकॉर्डेड संभाषण आपल्या सोशल माध्यमावरही टाकले आहे. या धमकीप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका... ठाकरेंचा माजी आमदाराला निरोपअडचणीच्या काळात पक्ष सोडू नका. जोमाने पक्षांचे काम करा, असे आवाहन करत शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी माजी आमदार महादेव बाबर यांना फोन केला.
लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होणार आहे. महादेव बाबर शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांचा निरोप विनायक राऊत यांनी बाबर यांना दिला.
इच्छुकांचा हिरमोड; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर Ganpat Gaikwad गोळीबार प्रकरणात मुलगा वैभवला पोलिसांची क्लिन चीटभाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या गोळीबार प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. गायकवाड यांचा मुलगा वैभव याला या प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली आहे. वैभव विरोधात कोणतेही ठोस पुरावे न आढळून आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी उल्हासनगर न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी चार्जशीटमध्ये केवळ दोनच आरोपींचा समावेश केला आहे.
नाशिकचे सिव्हील सर्जन आणि माजी डॉक्टरांवर गुन्हा दाखलजिल्हा शल्यचिकित्सक वी. डी. पाटील डॉ. आनंद पवार यांच्यासह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रतीक भांगरे यांच्याकडून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दिपाली झोले या रुग्णाचा गत महिन्यात मृत्यू झाला होता. भांगरे यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप भांगरे यांनी केला आहे. चार दिवसांपूर्वीच डॉ. आनंद पवार यांनी सिव्हिल सर्जन यांच्यावर मारहाणीचे आरोपही केले होते.
या तिघांनाही सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Sharad Pawar News Live: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हिरमोडराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मराठवाड्यातील दौरा सलग दुसऱ्यांदा रद्द झाला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हिंगोलीच्या नरसी येथे संत नामदेवांच्या दर्शनासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव टाकळगव्हाणकर यांच्या जनशताब्दी सोहळ्याला आज शरद पवार उपस्थित राहणार होते. कार्यक्रमाची हिंगोलीत संपूर्ण तयारी करण्यात आली होती. ऐनवेळी पवारांचा दौरा रद्द झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सगळ्यांचाच हिरमोड झाला आहे.
Indrajit Sawant News Live: इस्लाम खतरे में है म्हणणारे आणि हिंदू खतरे में है म्हणणारे दोन्ही प्रवृत्ती एकच : लंवाडेइतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरांना धमकी देऊन हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा अंतरंग पुन्हा दाखवला. जे पोटात ते कधी तरी ओठात येतेच. हिंदू आणि हिंदुत्व यात खूप फरक आहे. हिंदुत्ववादी हे हिंसक आणि मनुवादी असतात. त्यांना लोकशाही व भारतीय संविधान कधीच मान्य नसते. या भ्याड धमक्यांचा मी मागील आठवडाभर अनुभव घेतला आहेच. त्यांना हल्ली राजाश्रय असल्याने ते मोकाट सुटले आहेत. ही धर्मांधता RSS भाजपाच्या आशीर्वादाने सुरू आहे. बहुजनांचे अज्ञान हा त्यांचा मुख्य आधार असतो. इस्लाम खतरे में है म्हणणारे आणि हिंदू खतरे में है म्हणणारे दोन्ही प्रवृत्ती एकच आहेत. त्यांना संविधान प्रेमी व भारतीय नागरिकांनी सर्व पातळीवर रोखले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता व संघटक सचिव विकास लंवाडे यांनी केले आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वडिलांचे निधनदहिवडी : ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर, कन्या सुरेखा, जावई, सुना, नातवंडं असा मोठा परिवार आहे.
Manikrao Kokate - माणिकराव कोकाटे आज न्यायालयातील सुनावणीला हजर राहणारकृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आज जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणीला हजर राहणार असल्याची माहिती आहे. कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. काल न्यायालयाने जामीन मंजूर केल्या प्रकरणी ते आज न्यायालयात हजर होणार आहेत. जामिनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते न्यायालयात हजर होणार आहेत.
Dhairyasheel Mane : राऊत जेवढं बोलतील तेवढीच 4 माणसं आमच्याकडे वाढतात - धैर्यशील मानेठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत हे आकाशातनं उतरलेले विमान आहे ते रोज काहीतरी आकाशवाणी करत असतात दिल्लीमध्ये ते काय दिवे लावतात सगळ्यांना माहित आहे, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर टीका केली आहे. निलम गोऱ्हे या महाराष्ट्राच्या संविधानिक सर्वोच्च पदावर आहेत. त्यांच्यावर आरोप करताना राऊतांना काय बोलायचं हे कळलं पाहिजे. संजय राऊत जेवढे बोलतील तेवढीच चार माणसं आमच्याकडे वाढतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Manikrao Kokate : कृषिमंत्री कोकाटे शिक्षा प्रकरणी आज सुनावणीकृषिमंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोकाटे आज न्यायालयात हजर राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांना यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला अपील कालावधी संपेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिला आहे. तर आपली आमदारकी अपात्र होऊ नये यासाठी कोकाटेंनी अर्ज दिला आहे. त्यामुळे कोकाटेंची आमदारकी जाणार की राहणार? याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Satara News : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोकग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांचे वडील भगवान रामचंद्र गोरे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर माण तालुक्यातील बोराटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना घरात येऊन मारण्याची दिली धमकीजिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असं म्हणत प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसंच घरात येऊन मारण्याची दिली धमकी देखील दिल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा या व्यक्तीने आरोप केला आहे. सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलं आहे.
Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेकडून कोल्हापुरात ऑपरेशन टायगर?ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या स्वाभिमानीत असलेले सुजित मिणचेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ते 27 तारखेला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मिणचेकर हे शिवसेनेचे दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले होते.
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलनसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. त्या फरार आरोपीला अटक करावी आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा करावी आणि देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज मस्साजोगमधील ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.