कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आज जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणीला हजर राहणार असल्याची माहिती आहे. कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. काल न्यायालयाने जामीन मंजूर केल्या प्रकरणी ते आज न्यायालयात हजर होणार आहेत. जामिनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते न्यायालयात हजर होणार आहेत.
Dhairyasheel Mane : राऊत जेवढं बोलतील तेवढीच 4 माणसं आमच्याकडे वाढतात - धैर्यशील मानेठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत हे आकाशातनं उतरलेले विमान आहे ते रोज काहीतरी आकाशवाणी करत असतात दिल्लीमध्ये ते काय दिवे लावतात सगळ्यांना माहित आहे, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर टीका केली आहे. निलम गोऱ्हे या महाराष्ट्राच्या संविधानिक सर्वोच्च पदावर आहेत. त्यांच्यावर आरोप करताना राऊतांना काय बोलायचं हे कळलं पाहिजे. संजय राऊत जेवढे बोलतील तेवढीच चार माणसं आमच्याकडे वाढतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Manikrao Kokate : कृषिमंत्री कोकाटे शिक्षा प्रकरणी आज सुनावणीकृषिमंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोकाटे आज न्यायालयात हजर राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांना यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला अपील कालावधी संपेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिला आहे. तर आपली आमदारकी अपात्र होऊ नये यासाठी कोकाटेंनी अर्ज दिला आहे. त्यामुळे कोकाटेंची आमदारकी जाणार की राहणार? याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Satara News : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोकग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांचे वडील भगवान रामचंद्र गोरे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर माण तालुक्यातील बोराटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना घरात येऊन मारण्याची दिली धमकीजिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असं म्हणत प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसंच घरात येऊन मारण्याची दिली धमकी देखील दिल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा या व्यक्तीने आरोप केला आहे. सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलं आहे.
Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेकडून कोल्हापुरात ऑपरेशन टायगर?ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या स्वाभिमानीत असलेले सुजित मिणचेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ते 27 तारखेला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मिणचेकर हे शिवसेनेचे दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले होते.
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलनसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. त्या फरार आरोपीला अटक करावी आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा करावी आणि देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज मस्साजोगमधील ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.