Adani Group FMCG Major Adani Wilmar: अदानी समूहाने आपल्या अदानी विल्मर या फास्ट मूव्हिंग कंझ्युमर ग्रुप (FMCG) कंपनीचे नाव बदलले आहे. या संदर्भात अदानी समूहाकडून सांगण्यात आले की, कंपनीचे नाव बदलण्यासाठी भागधारकांकडून मंजुरी घेण्यात आली आहे, त्यानंतर या कंपनीचे नाव AWL ॲग्री बिझनेस लिमिटेड असे करण्यात आले आहे.
या रीब्रँडिंगचा उद्देश कंपनीच्या वाढीशी आहे. अदानी समूहाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, कंपनीचे नाव बदलून ॲग्री बिझनेस लिमिटेड असे केल्यास कंपनी कृषी आणि फुड क्षेत्रात काम करते हे स्पष्ट होईल.
अदानी समूहाची कंपनी ॲग्री बिझनेस लिमिटेडने कंपनीचे नाव बदलण्यासोबतच आपला व्यवसाय वाढवण्याचा प्लॅन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ॲग्री बिझनेस लिमिटेड आगामी काळात स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनावर भर देणार आहे.
याशिवाय कंपनीच्या भांडवली गुंतवणुकीच्या धोरणालाही वेग येऊ शकतो. कारण कंपनीचे चालू असलेले प्रकल्प, ज्यात सुमारे 1,300 कोटी रुपयांच्या फुड प्रक्रियाचा समावेश आहे. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात असलेल्या या फुड प्रक्रियेचे युनिट गेल्या महिन्यात सुरू झाले.
ही कंपनी खाद्यतेल आणि अनेक खाद्यपदार्थांचे उत्पादन करणार आहे. यापूर्वी, अदानी एंटरप्रायझेसने ऑक्टोबर 2024 मध्ये अदानी विल्मार सोबत फुड आणि FMCG व्यवसाय वेगळे करण्याची योजना रद्द केली होती.
आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत अदानी विल्मरचा नफा (एकत्रित निव्वळ नफा) 104% ने वाढून 411 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 201 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 15,859 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर 23.62% ची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 12,828 कोटी रुपयांची कमाई केली होती.