तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
मन आनंदी व आशावादी राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.