
क्रिप्टो करन्सीद्वारे तब्बल हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी आज सीबीआयने देशभरात छापे टाकले. पुणे, कोल्हापूर, नांदेडसह 60 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.
बनावट वेबसाईटद्वारे क्रिप्टो करन्सीशी संबंधित हा घोटाळा 2015मध्ये सुरू झाला. अमित भारद्वाज आणि अजय भारद्वाज या दोघा भावांनी 2015मध्ये गेन बिटकॉईन आणि इतर अनेक नावाने वेबसाईट तयार केल्या. लोकांना पॉन्झी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करायला लावली. या वेबसाईट्स व्हेरिएबलटेक पीटीई लिमिटेड नावाच्या कंपनीद्वारे नियंत्रित केल्या जात होत्या.
सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआयकडे तपास सामाजिक वर्ग
घोटाळय़ात मनी लॉण्डरिंगचेही आरोप झाले. महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, कर्नाटक, जम्मू-कश्मीरसह देशभरात एफआयआर दाखल झाले. या प्रकरणी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली. न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले.