पंचांग -
शुक्रवार : फाल्गुन शुद्ध १, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.५५, सूर्यास्त ६.३८, चंद्रोदय सकाळी ७.२९, चंद्रास्त सायंकाळी ७.०७, अमावास्या समाप्ती स. ६.१५, भारतीय सौर फाल्गुन ९ शके १९४६.
दिनविशेष -
२००० - मराठी विज्ञान परिषदेचे मानद कार्यवाह आणि राष्ट्रीय विज्ञान प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अ. पां. देशपांडे यांना विज्ञान व तंत्रज्ञानासाठीचा केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
२००४ - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००२ आणि २००३ च्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी अनुक्रमे बुजुर्ग क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर आणि माजी कर्णधार चंदू बोर्डे यांची निवड केली.