EPFO Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) संदर्भात मोठी बातमी आली आहे. EPFO ने शुक्रवारी 2024-25 साठी EPF ठेवींवर 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2023-24 साठी EPF वरील व्याजदरात किरकोळ वाढ करून 8.25 टक्के केले होते.
2022-23 मध्ये हा व्याजदर 8.15 टक्के होता. त्याचप्रमाणे, मार्च 2022 मध्ये, EPFO ने 2021-22 मधील सात कोटींहून अधिक ग्राहकांसाठी EPF वरील व्याज 8.1 टक्क्यांपर्यंत कमी केले होते. हे व्याजदर चार दशकांहून अधिक काळातील सर्वात कमी होते आहे. 2020-21 मध्ये हा व्याजदर 8.5 टक्के होता. यापूर्वी, 2020-21 साठी EPF वर 8.10 टक्के व्याजदर 1977-78 नंतर सर्वात कमी होता. त्यावेळी ईपीएफचा व्याजदर आठ टक्के होता.