"कृपया, पुरूषांबद्दल बोला, ते..."; पत्नीच्या छळामुळे मुंबईच्या TCS मॅनेजरने संपवलं जीवन, LIVE व्हिडिओत सगळंच सांगितले
esakal March 01, 2025 12:45 AM

आग्रा येथील मानव शर्मा (TCS कर्मचारी, मुंबई) यांनी 24 फेब्रुवारी रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूमागील कारण वैवाहिक वाद असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मृत्यूपूर्वी सात मिनिटांचा भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यात आपले दु:ख व्यक्त केले.

"पुरुष खूप एकटे असतात"

6 मिनिटे 56 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मानव शर्मा गळ्यात फास लावून बोलताना दिसतात. फासाचा एक टोक पंख्याला बांधलेला आहे. व्हिडिओत ते म्हणतात, "कायद्याने पुरुषांचेही रक्षण केले पाहिजे, नाहीतर अशी वेळ येईल की कुणीही पुरुष शिल्लक राहणार नाही, ज्याच्यावर आरोप करता येईल." त्यांनी आपल्या पत्नीच्या बाहेरील संबंधांबद्दल माहिती असूनही शांत राहण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यांनी हाताच्या जखमाही दाखवल्या आणि आधीही अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

पोलीस तक्रारीला उशीर?

मानव यांच्या कुटुंबाने आग्रा येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाशिवरात्रीच्या ड्युटीमुळे पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबाने केला. यानंतर त्यांनी थेट च्या मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार केली, आणि अखेर गुरुवारी रात्री व्हॉट्सअॅपवरून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

पत्नीने आरोप फेटाळले, नवऱ्यालाच जबाबदार ठरवले-

मानव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने स्वतःवर होणारे आरोप फेटाळले आणि पतीच मानसिकरीत्या अस्थिर असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, "मानव माझ्या भूतकाळाबद्दल ऐकूनच अस्वस्थ झाला होता. तो मद्यपान करायला लागला आणि सतत वाद घालू लागला."

तीन वेळा त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि "मीच त्याला वाचवले होते," असे पत्नीने सांगितले. मात्र, शेवटी त्याने मला माझ्या माहेरी सोडून दिले," असे ती म्हणाली.

पोलीस तपास सुरू-

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या आत्महत्येमागील खरे कारण तपासात स्पष्ट होईल का? की नेहमीप्रमाणे हे प्रकरण दुर्लक्षित होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.