महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे सूक्ष्म पण गंभीर असू शकतात. अचानक थकवा, जबड्याला वेदना, श्वास घेण्यास त्रास किंवा पोटदुखी ही संभाव्य चेतावणी असू शकते.
क्लिव्हलँड क्लिनिक मेडिकल सेंटर, अमेरिका येथील एका अभ्यासानुसार, महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात. याकडे लक्ष द्या –
हार्ट अटॅकमुळे केवळ छातीत नाही तर जबडा, मान, पाठ किंवा हातामध्ये वेदना जाणवू शकते. ती तीव्र किंवा सातत्यपूर्ण असू शकते.
कोणतेही श्रम न करता धावल्यासारखे वाटत असल्यास, किंवा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
प्रत्येक वेळेस पोटदुखी ही गॅस, फूड पॉइजनिंग किंवा फ्लूमुळे होते असे नाही. जर वेदना तीव्र असेल किंवा छातीत दडपण जाणवत असेल, तर दुर्लक्ष करू नका!
शारीरिक श्रम न करता अचानक थंड घाम येणे, हार्ट अटॅकचा इशारा असू शकतो. केवळ तणावामुळे असे होत असेल, तरीही योग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
योग्य विश्रांती घेतली तरीही सतत थकल्यासारखे वाटत असल्यास, किंवा अगदी साधे काम करायलाही त्रास होत असल्यास, हे गंभीर लक्षण असू शकते.
महिलांमध्येहार्ट अटॅक पारंपरिक डाव्या बाजूच्या वेदनांपेक्षा वेगळ्या प्रकारे जाणवू शकतो. छातीत घट्टपणा, जळजळ किंवा दडपण जाणवणे ही लक्षणेही हार्ट अटॅकची असू शकतात.