Significance of Dharmveer Balidan Mas: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेलं बलिदान अनमोल आहे. औरंगजेबाने महाराजांना बंदी करून त्यांना ४० दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या, ज्याचा परिणाम म्हणून आज २८ फेब्रुवारीपासून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो.
या वर्षी २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेला बलिदान मास पुढील ४० दिवस पाळला जाणार आहे. यामध्ये पुरुषांमध्ये मुंडन करणे, गोड पदार्थांचा त्याग करणे, चप्पल न घालणे, आणि जमिनीवर झोपणे यांसारख्या कृतींमधून श्रद्धांजली अर्पण केली जाते.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेलं बलिदान अपूर्व आहे. औरंगजेबाने महाराजांना अटक करून त्यांना ४० दिवस क्रूर यातना दिल्या. त्यांचे बलिदान हे स्वराज्य आणि धर्मासाठी होतं. त्यांना भोगलेल्या वेदना आपण सहन करू शकत नाही, पण त्यांच्या बलिदानामुळे आज आपल्याला स्वराज्य आणि धर्माची सुरक्षा मिळाली आहे.
बलिदान मास कशासाठी पाळावा?धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बलिदान मास पाळला जातो. हा महिना त्याग, सहनशीलता आणि बलिदान यांचे महत्त्व शिकवतो.
या महिन्यात आपल्या प्रिय गोष्टींचा त्याग करणे, साधे जीवन जगणे आणि सुखसोयींपासून थोडा दूर जाऊन महाराजांचे बलिदान समजून त्यांचा आदर करण्याची संधी मिळते.
संभाजी महाराजांनी आपले प्राण अर्पण केले, पण ते फक्त शारीरिक वेदना नव्हे, तर धर्म आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलं गेलेलं बलिदान होतं. त्यांचे बलिदानामुळेच आपल्याला हिंदवी स्वराज्य प्राप्त झालं आहे. म्हणूनच, महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ४० दिवस सुतक म्हणून पाळला जातो.
- रवी गोणे, हिंदू राज्यसेना शहर प्रमुख, सोलापूर