Pakistan Bomb Blast: पाकिस्तानात सध्या चॅम्पियन ट्रॉफी सुरु आहे. क्रिकेटच्या या मिनी वर्ल्डकपसाठी विविध देशांचे खेळाडू भारतात आले आहे. त्याचवेळी धक्कादायक बातमी आली आहे. पाकिस्तानात भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा बॉम्बस्फोट पाकिस्तानातील अकोरा खट्टक जिल्ह्यातील दारुल उलूम हक्कानिया मशिदीत झाला. मशिदीत झालेल्या या आत्मघाती स्फोटात कमीत कमी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मशिदीतील मौलानाचा या स्फोटा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहे. खैबर पख्तूनख्वाचे पोलीस महानिरीक्षक जुल्फिकार हमीद यांनी यासंदर्भात माहिती दिली.
शुक्रवारच्या नमाजसाठी पाकिस्तानातील मशिदीत चांगली गर्दी जमली होती. त्यावेळी एका आत्मघातकी स्फोट मशिदीत झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. घटनेच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहे. त्यांनी तपास सुरु केल्याचे जुल्फिकार हमीद यांनी जियो न्यूजला सांगितले. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळापासून 45 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरात हायअलर्ट आणि आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
जिओ-न्यूजनुसार, जमियत उलेमा-ए-इस्लाम समीउल हक (जेयूआय-एस) नेते मौलाना हमीद उल हक, जे मदरशाचे नायब मौलाना आहेत, ते स्फोटाच्या वेळी मशिदीत होते. त्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. काही बातम्यांमध्ये त्यांच्या मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
रमजानपूर्वीची ही शेवटची शुक्रवारची नमाज होती. त्यामुळे मशिदीत मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. जिओ न्यूजनुसार, हक्कानियाच्या मध्यभागी दार-उल-उलूम ही मशीद आहे. ज्याच्या पुढे दार-उल-हदीस आहे. ही एक मोठी इमारत आहे, जिथे मदरसाचे विद्यार्थी असतात. जवळच मौलाना समीउल हक आणि त्यांचा मुलगा राहतात. त्या ठिकाणी वसतिगृह आणि निवासी क्वार्टर आहेत.