आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात बी ग्रूपमधील अफगाणिस्तान क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 274 धावांचं आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये ऑलआऊट 273 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी सेदीकुल्लाह अटल याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी अझमतुल्लाह ओमरझई याने याने अर्धशतकी खेळी केली. अझमतुल्ला याने केलेल्या खेळीमुळे अफगाणिस्तानला 270 पार मजल मारता आली. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे आता कांगारु हे विजयी आव्हान सहज पूर्ण करतात? की अफगाणिस्तान आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला रोखतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
अफगाणिस्तान टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. सलामीवीर रहमानुल्लाह गुरुबाज याचा अपवाद वगळता टॉप 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. रहमानुल्लाह याला भोपळाही फोडता आला नाही. सेदीकुल्लाह अटल याने 95 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. इब्राहीम झाद्रान याने 22, रहमत शाह 12, कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने 20 धावांचं योगदान दिलं.
अनुभवी मोहम्मद नबी याने घोर निराशा केली. नबी 1 धाव करुन रन आऊट झाला. गुलाबदीन नईब याने 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. राशिद खान याने 19 धावांची निर्णायक खेळी केली. अझमतुल्लाह ओमरझईने निर्णायक क्षणी केलेल्या खेळीमुळे अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियासमोर आव्हानात्मक असं आव्हान ठेवता आलं. ओमरझई याने 5 सिक्स आणि 1 फोरसह 63 बॉलमध्ये 67 रन्स केल्या. तर नूर अहमद याने 6 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वार्शुइस याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झाम्पा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर नॅथन एलिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
कोण जिंकणार सामना?
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.