पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरील लज्जास्पद बलात्कार प्रकरणातील 37 वर्षीय आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे यांना पोलिसांनी पुण्यातील शिरूर येथून अटक केली आहे. आज त्याला पुणे न्यायालयात हजर केले जाईल.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा पर्यटक जम्मू आणि काश्मीरला भेट देण्यास घाबरत होते, परंतु कलम ३७० रद्द केल्यानंतर ही परिस्थिती बदलली आहे. 5ऑगस्ट2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले.
प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभाला उद्धव ठाकरे उपस्थित न राहिल्यामुळे, महाराष्ट्रात महायुतीने त्यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. तसेच, त्याच्या हिंदू असण्यावरही प्रश्न उपस्थित केले गेले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रात महायुती सरकार 2.0 ची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. आता राज्याचे 100 दिवस पूर्ण होणार आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला.
Nagpur News: सध्या ऑनलाईन फ्रॉडचे प्रकरण वाढत आहे. जास्त लोभापोटी अनेक वेळा लोक फसवणुकीला बळी पडतात. एका व्यावसायिकाला गुंतवणुकीवर मोठे परतावे देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने 2.32 लाख रुपयांने गंडवले.व्यावसायिकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघात 3 ट्रक एकमेकांना धडकले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणे ट्रक थांबवणे एका ट्रक चालकाला महागात पडले
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) फरार आरोपी उन्नाथन अरुणाचलम यांच्या मुलाला मनोहरला अटक केली आहे. 122 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील ही चौथी अटक आहे.मनोहर अरुणाचलमला आज न्यायालयात हजर केले जाईल.
Mumbai News: मुंबईतील लालबाग परिसरातील एका गगनचुंबी इमारतीला आज आग लागली. काही क्षणातच आगीने इमारतीच्या वरच्या भागाला वेढले. या इमारतीचे नाव साल्से द 27 आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना एका पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा संदेश मिळाला आहे
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिस (एमबीव्हीव्ही) आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 3 ने उत्तर प्रदेशातील एका महिलेच्या दोन महिन्यांपूर्वीच्या खून प्रकरणाचा 24 तासांत यशस्वीपणे उलगडा केला. अमित सिंग याला प्रेयसीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. प्रिया सिंग असे या मयत महिलेचे नाव आहे.
अमेरिकेने भारतीय विद्यार्थिनी नीलम शिंदेच्या कुटुंबाला आपत्कालीन व्हिसा मंजूर केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर हा व्हिसा मंजूर करण्यात आला. नीलमच्या वडिलांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे आपत्कालीन व्हिसा देण्यासाठी अपील केले होते.
नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अॅडव्हान्स्ड मटेरियल्स कॉर्पोरेशन यांच्यात ₹1,740 कोटी गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबालागन आणि एचएस ह्युसंग अॅडव्हान्स्ड मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सियांग यांनी या करारावर स्वाक्षरी केली.