मुंबई : ईपीएफओने पुन्हा एकदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वरील व्याजदर ८.२५ टक्के निश्चित करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या ईपीएफओ बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.ईपीएफओने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वरील व्याजदर निश्चित केला आहे. आता ते मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवले जाईल. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर हा व्याजदर ईपीएफओच्या सात कोटींहून अधिक सदस्यांच्या खात्यात जमा केला जाईल.फेब्रुवारी २०२४ मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२२-२३ मध्ये व्याजदर ८.१५ टक्क्यावरून २०२३-२४ साठी ८.२५ टक्के केला होता. तर मार्च २०२२ मध्ये ईपीएफओने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदर ८.१ टक्क्यांपर्यंत कमी केला होता.. हा दर चार दशकांमधील सर्वात कमी आहे. यापूर्वी, २०२०-२१ मध्ये हा दर ८.५ टक्के होता. १९७७-७८ नंतर ईपीएफवरील ८.१ टक्के व्याजदर हा सर्वात कमी होता. तेव्हा व्याजदर ८ टक्के होता.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना रवर्षी त्यांच्या खातेधारकांना देण्यात येणाऱ्या व्याजदराची घोषणा करते. परंतु ते लागू करण्यासाठी अर्थ मंत्रालयाची मान्यता आवश्यक असते. सरकारच्या मंजुरीनंतरच व्याजदर लागू केला जातो. मार्च २०२० मध्ये ईपीएफओने पीएफवरील व्याजदर ८.५ टक्क्यांपर्यंत कमी केला होता, जो २०१९-२० साठी सात वर्षांचा नीचांक होता. यापूर्वी २०१८-१९ मध्ये हा दर ८.६५ टक्के होता.
मागील वर्षांतील व्याजदर २०१६-१७ : ८.६५ टक्के२०१७-१८ : ८.५५ टक्के२०१५-१६ : ८.८ टक्के२०१३-१४ आणि २०१४-१५ : ८.७५ टक्के२०१२-१३ : ८.५ टक्के२०११-१२ : ८.२५ टक्के
जानेवारीमध्ये नियम बदललेकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जानेवारीपासून नवीन बदल लागू केले आहेत. याचा उद्देश सदस्यांसाठी प्रक्रिया सोपी करणे आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारणे आहे. या बदलांमध्ये उच्च पेन्शनशी संबंधित स्पष्टीकरणे, संयुक्त घोषणा प्रक्रियेचे सरलीकरण आणि इतर सुधारणांचा समावेश आहे. यामुळे ईपीएफओशी संबंधित सेवा पूर्वीपेक्षा सोप्या आणि सोयीस्कर होतील.