Latest Marathi News Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार
esakal March 01, 2025 06:45 PM
PM Narendra Modi Live Updates: भारत मंडपम येथे NXT कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित

भारत मंडपम येथे NXT कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भारत अनेक जागतिक शिखर परिषदेचे नेतृत्व करत आहे. अलीकडेच, मला फ्रान्समध्ये झालेल्या AI समिटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. भारत या समिटचा सह-यजमान होता ज्याने जगाला AI भविष्याकडे नेले. आता यजमानपदाची जबाबदारी भारताकडे आहे. भारताने G20 शिखर परिषद यशस्वीरित्या पार पाडली.

Delhi Live Updates: नासाचे माजी अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांनी अटल टिंकरिंग लॅबला दिली भेट

नासाचे माजी अंतराळवीर आणि कोलंबिया विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक माइक मॅसिमिनो यांनी नवी दिल्लीतील अटल टिंकरिंग लॅबला दिली भेट.

Amit Shah Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. बैठकीचे अध्यक्ष अमित शहा असणार आहेत.

Uttarakhand Avalanche Live Updates: उत्तराखंडच्या बद्रीनाथ इथं हिमस्खलनामुळे अडकलेल्या ५५ मजुरांपैकी ३३ मजुरांची सुटका

उत्तराखंडच्या बद्रीनाथ इथं हिमस्खलनामुळे अडकलेल्या ५५ मजुरांपैकी ३३ मजुरांची सुटका, २२ मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु.

Live : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीवर आज होणार फैसला

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर आज फैसला होणार आहे.

Sangli News Live : शक्तिपीठ महामार्गाला विरोध, 19 गावं काळी गुढी उभारून करणार सरकारचा निषेध

शक्तिपीठ महामार्गासाठी गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी काढलेली सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे.

या मागणीसाठी 19 गावात काळी गुढी उभा करून सरकारचा केला निषेध

Live : वाशिममध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण, ६ हजार कोंबड्यांचा मृत्यू

विदर्भात बर्ड फ्लूची एंट्री झाली आहे. वाशिममध्ये ६ हजार कोंबड्यांचा मृत्यू ६ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

Live : प्रशांत कोरटकरविरोधात कोल्हापूरनंतर नागपुरात गुन्हा दाखल

इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thamarassery Police LIVE : शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

केरळ : २७ फेब्रुवारी रोजी कोझिकोडमधील थामरासेरी येथे शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत दहावीच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या हाणामारीत जखमी झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. थामरासेरी पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी केरळचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Indrajit Sawant LIVE : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी

कोल्हापूर : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करून माहिती संकलित करण्यात आली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फॉरेन्सिक विभागाकडून रात्री उशिरा माहिती घेण्याचे काम पूर्ण झाले. प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले आक्षेपार्य विधान आणि इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फॉरेन्सिक विभागाने चौकशी केली.

Swargate Bus Rape Case LIVE : नराधम दत्तात्रेय गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : स्वारगेट एसटी बस स्थानकात शिवशाहीमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम दत्तात्रेय गाडेला गुनाटच्या (ता. शिरूर) ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. २८) पहाटे सव्वाच्या सुमारास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Rishikesh-Badrinath Highway LIVE : ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्ग डोंगरावरील ढिगारा रस्त्यावर कोसळ्यामुळे बंद

उत्तराखंड : कर्णप्रयागजवळील ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्ग डोंगरावरील ढिगारा रस्त्यावर कोसळ्यामुळे बंद झाला आहे. सततच्या पावसामुळे महामार्ग बंद असून या महामार्गावर विविध ठिकाणी भूस्खलन होत आहे.

Delhi Rain LIVE : राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या अनेक भागांत पावसाला सुरुवात

पहाटेपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या अनेक भागात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आज काहीअंशी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Indian Army LIVE : जवान सचिन कापूरकर यांना अखेरचा निरोप

रेठरे बुद्रुक : भारतीय लष्करातील सेवेत असणाऱ्या सचिन बबनराव कापूरकर यांचे काल रात्री अल्प आजाराने निधन झाले. येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. ते आठवड्यापूर्वी सुटीवर आले होते. सध्या ते चंडीगड सैन्य दलात कार्यरत होते.

Jagdeep Dhankhar LIVE : उपराष्ट्रपती जगदीप धनकड आज महाराष्ट्रात एक दिवसाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड आज (ता. १) महाराष्ट्रात एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती मुंबईतील केपीबी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वार्षिक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, असे उपराष्ट्रपती कार्यालयातर्फे कळविले आहे.

Maharashtra Heat Wave Live : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासून तीव्र उष्णतेच्या लाटा; हवामान विभागाचा इशारा

Latest Marathi Live Updates 1 March 2025 : देशाच्या बहुतांश भागात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना सोशल मीडियावरून पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘‘स्वारगेट स्थानकात बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या संपूर्ण घटनेची ‘मिनिट टू मिनिट’ चौकशी करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपराष्ट्रपती जगदीप धनकड आज महाराष्ट्रात एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. नेपाळची राजधानी काठमांडूसह भारतातील बिहार व ईशान्य भारताला मध्यम स्वरूपाच्या भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.१ इतकी होती. तर, उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम येथील माना गावात शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या दरम्यान हिमस्खलन होऊन सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) रस्त्याच्या कामावरील २५ कामगार अडकले आहेत. त्याचबरोबर राज्यात अजूनही काही भागांत थंडी कमी झालेली दिसत नाहीये. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.