होळीपूर्वी महागाईचा धक्का, गॅस सिलेंडर महागला, इतके वाढले दर
ET Marathi March 01, 2025 06:45 PM
मुंबई : सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ केली आहे. नवीन दर १ मार्चपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.दरम्यान, विमान वाहतूक क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. तेल कंपन्यांनी एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती कमी केल्या आहेत. यामुळे विमान प्रवास स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.मार्चच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता दिल्लीत १८०३ रुपये, कोलकातामध्ये १९१३ रुपये, मुंबईत १७५५.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १९६५ रुपये झाली आहे.मात्र, घरगुती गॅस सिलेंडरच्या (१४.२ किलो) किमतीत कोणताही बदल झालेला नाही. ग्राहकांना दिलासा देत तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती जैसे थे ठेवल्या आहेत. सध्या, घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये ८०३ रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.मार्च २०२५ साठी एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीत किंचित घट झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत त्याच्या किमती ०.२३ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या, ज्यामुळे दर प्रति किलोलिटर २२२ रुपयांनी कमी होऊन ९५,३११.७२ रुपये प्रति किलोलिटर झाले. यापूर्वी, फेब्रुवारी २०२५ च्या आढाव्यात एटीएफच्या किमती ५.६ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या होत्या. या महानगरांमध्ये एटीएफची किंमतदिल्ली ९५,३११.७२ रुपयेकोलकाता .९७,५८८.६६ रुपयेमुंबई. ८९,०७०.०३ रुपयेचेन्नई ९८,५६७.९० रुपये
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.