वजन कमी करताना कोणती फळे खाऊ नयेत? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात
GH News March 02, 2025 02:06 AM

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लोकं वजन वाढण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. लठ्ठपणामुळे केवळ आत्मविश्वास कमी होत नाही तर मधुमेह आणि रक्तदाबाची समस्याही वाढते. वजन कमी करण्यासाठी लोकं जिममध्ये जातात आणि डाएटिंग देखील करतात. पण बऱ्याच वेळा लोकांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. कारण ते आहारात अन्नाचे सेवन कमी करून फळांचे अधिक सेवन करतात. पण तुम्ही जेव्हा अशा काही फळांचे अधिक सेवन करतात ज्याने वजन झपाट्याने वाढते.

यावेळी आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की, वजन कमी करताना अनेक लोकं फळे निवडताना ही चुक करतात. फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु काही फळे अशी असतात ज्यात नैसर्गिक साखर आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. हे वजन वाढवण्यास मदत करू शकतात. वजन कमी करताना कोणती फळे खाऊ नयेत, हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

केळी

काहीजण वजन कमी करण्यासाठी त्यांच्या डाएटमध्ये अधिकतर केळीचे सेवन जास्त करतात. केळी हे ऊर्जा देणारे फळ आहे, परंतु त्यात कॅलरीज खूप जास्त असतात. जर तुम्ही कॅलरीज कमी असलेल्या आहारावर असाल तर त्याचा वापर मर्यादित असावा. केळी खाण्याऐवजी सफरचंद, संत्री आणि पपई खावी.

आंबा

आंबा हा असा फळ आहे जो प्रत्येकाला आवडतो. कारण आंबा खायला खूप चविष्ट लागतो. उन्हाळ्या सुरू झाला की प्रत्येक घरांमध्ये आंब्याच्या पेट्या येतात. पण आंब्यामध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. एका मध्यम आकाराच्या आंब्यापासून सुमारे १५० कॅलरीज मिळू शकतात. अशा परिस्थितीत वजन कमी करताना आंबा कमी प्रमाणात खा.

द्राक्ष

द्राक्षे दिसायला लहान असतात पण त्यांचा मधील असलेले ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते. १०० ग्रॅम द्राक्षांमध्ये अंदाजे ७० कॅलरीज असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या डाएटवर असाल तर द्राक्षे कमी प्रमाणात खावीत. त्याऐवजी नाशपती खा.

चेरी

चेरीमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर चेरीचे सेवन करू नका. जर तुम्ही चेरी जास्त खाल्ले तर वजन कमी करण्यावर परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी, स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी सारखी फळे अधिक फायदेशीर ठरू शकतात.

खजूर

खजूर हे सुक्या मेव्यामध्ये गणले जातात. त्यात साखर आणि कॅलरीज दोन्ही मुबलक प्रमाणात आढळतात. जर तुम्ही त्यांचे जास्त सेवन केले तर वजन वाढू शकते. वजन कमी करण्याच्या आहारात खजूरचा समावेश करू नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.