swt112.jpg
48431
वेंगुर्ले - काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
काव्यगायन स्पर्धेमध्ये
गाथा कोळंबकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १ः मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून येथील नगर वाचनालय संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या काव्यगायन स्पर्धेत नवाबाग शाळेच्या गाथा कोळंबकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
दुर्वा गावडे (वेंगुर्ले क्र.२) हिने द्वितीय, भार्गवी यादव (वेंगुर्ले हायस्कूल) हिने तृतीय क्रमांक मिळविला. मराठी साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे पाचवी ते तवीतील मुलांसाठी पाठ्यपुस्तकातील काव्यगायन स्पर्धा घेण्यात आली. यात २१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यातील विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३०० आणि २०० रुपये बक्षिसे देण्यात आली. परीक्षण कैवल्य पवार, भाऊ करंगुटकर यांनी केले. कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कवितागायन म्हणजे काय व ते कसे करावे, हे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी दूरदर्शनवरील काव्यगायनाचे कार्यक्रम पाहावेत, असे आवाहन कार्यवाह अनिल सौदागर यांनी केले. यावेळी सदस्य महेश बोवलेकर यांच्यासह ललिता जाधव उपस्थित होते.