Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर
esakal March 03, 2025 04:45 AM
Supriya Sule Live: सुप्रिया सुळे यांचा छेडछाडीच्या घटनेवर तीव्र संताप

मुंबईतील दहिसर येथील गणपत पाटील नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आयोजित "सुप्रियाताई आपल्या दारी" या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या वेळी, एकनाथ खडसे यांच्या मुलीबरोबर झालेल्या छेडछाडीच्या घटनेबाबत त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची असल्याचे सांगत, अशा प्रकारच्या घटना समाजात घडू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, त्या कठोर शब्दांत या प्रकाराचा निषेध करतात, असेही त्यांनी नमूद केले.

Raj thackeray live: बोरिवलीतील पोटोबा खाद्य महोत्सवाला राज ठाकरे यांनी दिली भेट

मुंबईच्या बोरीवली पूर्वेकडील चौगुले हायस्कूल मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोटोबा खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या खाद्य महोत्सवाला आज भेट दिली. मनसे शाखा अध्यक्ष राजू माने यांच्या माध्यमातून या खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

LIVE NEWS: बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचली लाखोची रक्कम

तिसंगी, ता.2: सोनके (ता. पंढरपूर) येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम दोनदा फोडण्याचा अज्ञात चोराकडून प्रयत्न झाला आहे. 1 मार्च रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान हे एटीएम अज्ञात चोराकडून पैसे लुटण्याच्या उद्देशाने तोडण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्क मुळे हा अनर्थ टळला.

Raj thackeray live: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई उपनगर दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई उपनगर दौऱ्यावर असून, त्यांनी सर्वप्रथम बोरीवली प. येथे आयोजित मनसे चषक क्रिकेट टुर्नामेंटला हजेरी लावली. या स्पर्धेत संपूर्ण मुंबईसह वसई आणि पनवेल येथून आलेल्या ३६ संघांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे, या टुर्नामेंटमध्ये अमित ठाकरे आणि त्याचा मुलगा कियान यांनीही खेळत बॅटिंग केली. यानंतर, राज ठाकरे दहिसर पूर्व येथील शिवनेरी चाळ शाखा क्र.५ मधील मनसे गड कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, बोरीवली पूर्व येथे मनसे शाखा क्र.११ तर्फे आयोजित महाराष्ट्राची खाद्य संस्कृती कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत.

Thane Live : राऊतांच्या स्पर्शाने पुतळा अपवित्र; शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला.

ठाण्यात आनंद आश्रमातील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुष्पहार घातला आणि दर्शन घेतलं. यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला.

Thane Live : आनंद आश्रमाबाहेर राडा, दोन्ही शिवसेना आमने सामने

-शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा मेळावा

-ठाण्यात शिंदे आणि ठाकरें गट आमने सामने

-खासदार संजय राऊत ठाण्यात दाखल

-आनंद आश्रमाच्या समोर शिंदेच्या सेनेची गर्दी

-शिंदेच्या नेत्यांकडून ठाकरे गटाला विरोध

Live : ठाण्यातील मेळाव्याच्या अगोदर संजय राऊत यांच्याघरी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते एकत्र

- ठाण्यातील मेळाव्याच्या अगोदर संजय राऊत यांच्याघरी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते एकत्र येणार

- ठाण्याचा मेळाव्यात काय मार्गदर्शन असावे या बाबत चर्चा करणार

- काही वेळात संजय राऊत यांच्या घरी, अंबादास दानवे, भास्कर जाधव , अरविंद सावंत इत्यादी नेते दाखल होत आहेत.

Mumbai Live : साकीनाका येथील 90 फीट रोड येथे भीषण आग

साकीनाका येथील 90 फीट रोड येथे भीषण आग लागली आहे गुलशन कंपाऊंड येथील गोडाऊनला आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दल घटनास्थळी रवाना संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य गुलशन कंपाउंड व इतरत्र नेहमी आगीच्या घटना घडत असतात अग्निशमन दल या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे

Pune Live : महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट, पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज

महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट, पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज वर्तवला आहे

सव्वाशे वर्षानंतर पुणे पुन्हा तापणार आहे

केरळ आणि तमिळनाडू मध्ये तापमान कमी राहण्याची शक्यता आहे

Pune Live : पोलिसांकडून नराधम दत्ता गाडे याच्या मोबाईलचा शोध सुरू

पुणे पोलिसांकडून नराधम दत्ता गाडे याच्या मोबाईल चा शोध सुरू

नराधम गाडे याने मोबाईल शिरूर मध्ये एका शेतात लपवल्याची माहिती आली समोर

घटना घडल्यावर मोबाईल वरून कोणा कोणाला फोन केले याचा तपास केला जाणार

Virar Live : चंदनसार रोडवर ट्रकचा अपघात

विरार पूर्वेला चंदनसार रोडवर एका ट्रकचा अपघात झाला आहे. चंदनसार रोडवरील गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. ट्रकचा मागील भाग अचानक उचलला गेल्याने सगळे दगड रस्त्यावर पडले पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Live : "खडसेंच्या नातीची छेड काढणारे विशिष्ट पक्षातले" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार मुक्ताईनगर मध्ये घडला. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली."आरोपींना माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणार. खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत" असं ते यावेळी म्हणाले.

Live : शहरातील वाढलेल्या पाणीपट्टीवर सगळ्याच राजकीय पक्षांचे मौन

अहिल्यानगर शहरातील सगळे नागरिक वाढलेल्या पाणीपट्टी दरामुळे चिंतेत आहेत. पण याविषयी कुणी प्रशासनाला जाब विचारला नसून सगळेच पक्ष या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत.

Mumbai Live : मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची हजेरी , मनसेचे नेतेही उपस्थित

मनसेतर्फे शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिजात पुस्तक प्रदर्शनाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हजेरी लावली. त्यांच्याबरोबर मनसे नेते संदीप देशपांडेही होते.

उन्हाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला चहा पाण्याच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार नंदुरबार जिल्ह्यात चिकन पॉक्सचा धोका,लहान मुलांना लागण

लहान बालकांमध्ये सर्वाधिक चिकन पॉक्सची लागण झालीय. चिकन पॉक्स हा संसर्गजन्य रोग असल्याने अनेक लहान मुलांना त्याची लागण होतेय. ताप येणे, अंगाला पुरळ, फोडनंतर खरुज होण्याचा धोका. लहान मुलांसोबतच वयोवृद्धांना देखील चिकन पॉक्सची लागण झालीय.

Live : एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन

वेतन आणि इतर मागण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

उद्धव सेनेच्यावतीने ठाण्यात शक्तिप्रदर्शन

आज उद्धव सेनेच्या वतीने ठाण्यात शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. या मेळाव्यात संजय राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाण्यातील एन. के. टी. कॉलेज या ठिकाणी होणार आहे.

हा प्रकार दुर्दैवी, गुंडांना आता पोलिसांचाही धाक राहिलेला नाही - एकनाथ खडसे

हा प्रकार दुर्देवी आहे. महाराष्ट्राची अलीकडची परिस्थिती बघितली तर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी जी घटना घडली आहे. ज्यांनी गुन्हा केला आहे, ते गुंड आणि टवाळखोर लोक आहेत. त्याठिकाणी पोलीसही या मुलींबरोबर उपस्थित होता. मात्र, या गुडांनी पोलिसांनाही मारहाण केली. त्यांना पोलिसांचाही धाक राहिलेला नाही. पोलीस असतानाही मुलींची छेड काढण्याची हिंमत या गुंडांची होत असेल तर कठीण आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल - रुपाली चाकणकर

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला त्याकडे मी स्वतः लक्ष दिले आहे

गुन्हा दाखल झालेला आहे, त्या टवाळखोर याला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले असेल

बऱ्याच गोष्टी समोर येतील, जो यात दोषी आढळले जाईल त्यावर कठोर कारवाई केली जाईल

त्या टवाळ खोरांनी व्हिडिओ काढला, गार्ड ने त्यांना खाली आल्यानंतर हटकले होते

यापूर्वी त्या टवाळ खोरवर गुन्हा दाखल आहे, या प्रकरणी

ही लोकं, माणसाच्या कळपातील विकृती आहेत यांचे चेहरे आता समोर आणली पाहिजे

काळी कपडे न घालता त्यांना आता जनतेसमोर आणले पाहिजे, ही विकृती कमी झाली पाहिजे

मुख्यमंत्री, आयोग, पोलिस नक्की दखल घेतली जाईल

मिडिया trail न करता, पोलीस कारवाई करत असतील तर त्यांना सहकार्य केले पाहिजे

Live: इस्त्रायलने पवित्र रमझान महिन्यानिमित्त अमेरिकेच्या गाझा युद्धविराम प्रस्तावाला सहमती दिली

इस्त्रायलनं पवित्र महिना रमझान निमित्त इस्त्रायल - गाझा युद्धविरामाच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली

Jalgaon Live: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीच्या घटनेमुळे राज्यात खळबळ

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीच्या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली आहे. जळगाव जिल्ह्यातीलमुक्ताई मंदिरात टवाळखोरांनी मुलींची छेडछाडी आहे.आरोपी मोकाट असून पोलिसांची अद्याप देखील कारवाई झाली आहे

Solapur: नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शहर स्वच्छतेसाठी योगदान: रविवारी कचरा संकलनाचे कार्य

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सेवाभावी कार्यासाठी प्रसिद्ध आहे. कपाळावर स्मरण, मुखी समर्थांचे नाम तर दोन्ही हात जोडून घालावयाचा ‘जय सद्गुरु’ असेच काही चित्र या बैठकीचे नाव काढल्यावर आपल्या समोर येते. परंतु याच हात जोडणाऱ्या हातांनी रविवारी सकाळी हाती खराटे आणि झाडू घेत शहरातून कचरा संकलित करत शहर स्वच्छ केले.

Jalgaon Live: भाजपच्या एका नेत्याच्या मुलीची जळगाव जिल्ह्यात छेडछाड; धक्कादायक घटना समोर

भाजपच्या एका महिला नेत्याच्या मुलीची छेडछाड जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

टवाळखरानी मुलीची छेडछाड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Live: पंतप्रधान मोदींचा गुजरात दौरा: सोमनाथ मंदिर भेट आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सोमनाथ मंदिराला भेट देऊन पूजा अर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ते राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

Amaravati Live : अमरावतीतील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र

लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरु असून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र केले जात आहे. अमरावतीत 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.

Anjali Damania : धनंजय मुंडेंना आता बडतर्फ करायची वेळ आलीय, अंजली दमानियांचा घणाघात

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर घणाघात केला आहे. त्यांना बडतर्फ केले पाहिजे असं त्यांनी म्हटले आहे. वाल्मीक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे हे सीआयडीने दोषारोपपत्रात म्हटले आहे. कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. याचे सगळे पुरावे दिले आहेत त्यामुळे मुंडेंना आता बडतर्फ करायची वेळ आलीय असं दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

karuna Munde Live : धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार, करुणा मुंडेंचा दावा

अजित पवार यांनी धनंजय मुंंडे यांचा राजीनामा दोन दिवस आधीच घेतला आहे, ते उद्या (सोमवारी) आपल्या पदाचा राजीनामा देतील असा दावा धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.