आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. उभयसंघातील सामना हा रविवारी 2 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तसेच दोन्ही संघांनी साखळी फेरीत सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे रविवारी दोन्ही संघात विजयी हॅटट्रिक करण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 खेळाडूंना संधी मिळू शकते.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. शमीला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्रास जाणवल्याने काही वेळ मैदानाबाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे आता शमीला विश्रांती दिल्यास त्याच्या जागी अर्शदीप सिंह याला संधी मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्शदीप सिंह याने बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल याच्यासह सराव केला. त्यामुळे अर्शदीप खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे रोहितलाही न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे रोहितला विश्रांती दिल्यास त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळू शकते. ऋषभ आणि अर्शदीप यांना संधी मिळाल्यास दोघांचं चॅम्पियन्स ट्रॉफीतील पदार्पण ठरेल.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि हर्षित राणा.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.