राज ठाकरेंच्या लेकीला पाहिलंत का? लाल अनारकली ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट; बॉलिवूडशीही आहे संबंध
GH News March 04, 2025 01:12 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या भाषण शैलीने आणि स्पष्ट विचारांनी नेहमीच लोकप्रिय आहेत. राज ठाकरे यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या बद्दलचे किस्से ऐकण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

राज ठाकरेंच्या लेकीचे सुंदर फोटोशूट

सध्या राज ठाकरे यांच्या लेकीची सोशल मीडियावर फार चर्चा होताना दिसत आहे. राज ठाकरेंची लेक उर्वशी ठाकरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. उर्वशीने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटसाठी उर्वशीने लाल रंगाचा अनारकली ड्रेस घातल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. अनारकली ड्रेसवर तिने त्याला शोभेल असे सुंदर झुमके घातले आहेत. उर्वशीच्या अनारकली ड्रेसमधील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

‘जुडवा 2’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून धुरा सांभाळली

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘जुडवा 2’ या बॉलिवूड चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटापासूनच तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. राज ठाकरेंचं सिनेमाविषयीचं प्रेम सर्वश्रृतच आहे. आणि हेच स्वप्न लेक उर्वशीने पूर्ण केलं आहे. दरम्यान इन्स्टाग्रामवर उर्वशीचे 25 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

उर्वशीप्रमाणेच अमित ठाकरे यांच्याबद्दलही सोशल मीडियावर नेहमीच चर्चा 

उर्वशीप्रमाणेच अमित ठाकरे यांच्याबद्दलही सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसते. त्यांचं खेळांबद्दच प्रेम, त्यांचेही राज ठाकरेंप्रमाणे स्पष्ट विचार असल्याचं त्यांच्या अनेक मुलाखतींमधून समोर आलं आहे.शिक्षणाबद्दल बोलायचे झालं तर अमित ठाकरे रामनिरंजन आनंदीलाल पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. राज ठाकरेंप्रमाणेच अमितलाही मोकळ्या वेळेत स्केचेस काढायला आवडतं.

अमित यांनीप्रसिद्ध बॅरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची मुलगी मिताली बोरुडेशी लग्न केलं आहे दोघांनी जानेवारी 2019 मध्ये लग्न केलं. या लग्नाला भारत आणि परदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मिताली बोरुडे ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि त्या फोटोंना भरभरून कमेंट्स, लाइक्सही मिळतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.