“काल बैठक झाल्याच मला कळलय. सुरुवातीपासून मी हे सांगत होतो, हे महाभंयकर आहे. जल्लाध, राक्षस, हैवान या सगळ्याच्या पलीकडे ती घटना घडलेली आहे. जे आमच्या जिल्ह्यातले नेते 12 डिसेंबरला बोलताना हे प्रत्येक जिल्ह्यात घडतच असतं, हे राज्यात दुसऱ्या जिलह्यात घडलेले नाही का? हे अशा प्रकारच वक्तव्य म्हणजे यांची संवेदनशीलता पूर्णपणे संपलेली दिसली” असं भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. हा विषय सुरुवातीपासून लावून धरणारे सुरेश धस यांनी नेहमीच्या शैलीत रोखठोक भाष्य केलं आहे.
“जे 16 डिसेंबरला माझं भाषण होतं, हे सगळे मुद्दे तंतोतत बाहेर आलेले आहेत. आता घटिका जवळ अलीय असं कळतय. अजितदादांनी निर्णय बदलू नये. यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे” असं सुरेश धस म्हणाले. “महाराष्ट्रातील जनतेने ते फोटो, व्हिडिओ पाहिले आहेत. ज्याला ह्दय आहे, तो प्रत्येक माणूस काल रडला असेल. इतकं भयानक कृत्य या लोकांनी केलेलं आहे. मी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानीन. मी 16 तारखेपासून ज्या-ज्या मागण्या केल्या, त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जी पत्र दिली, त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली” असं सुरेश धस म्हणाले. “मुख्यमंत्री 100 टक्के राजीनामा घेतील हा विश्वास आहे. राजीनामा घेऊन यांना घरी पाठवा” असं सुरेश धस म्हणाले.
‘फाशी झाली पाहिजे’
“मी स्वत: संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही. मी हवेत अजिबात बोलत नाही. जे मी बोललो, ते सगळं चार्जशीटमध्ये आलं आहे. माझ्या बोलण्यात एखाद-दुसरा शब्द राहिला असेल. एका मुलाखतीत मी शास्त्रशुद्ध लघुशंका शब्द वापरला होता. लघुशंका नाही, दोन पाय आडवे लावून त्याच्या तोंडावर काय करण्यात आलय ते तुमचं तुम्हीच दाखवा. हे एवढे भयानक लोक आहेत. या लोकांना लवकरात लवकर तीन महिन्यात, सहा महिन्यात, जास्तीत जास्त वर्षभरात फाशी झाली पाहिजे असं सुरेश धस म्हणाले.
‘सातपुडा बंगल्यावर खंडणीसंदर्भात बैठक झाली होती की नाही?’
“मुख्यमंत्र्यांनी जो शब्द पहिल्यांदा मीडियापुढे वापरला होता, मी यातल्या कोणालाच सोडणार नाही. त्या प्रमाणे त्यांनी कोणाला सोडलेलं नाही. ही घटना खंडणीमुळे झाली आहे” असं सुरेश धस म्हणाले. “मी जे आरोप केलेत, त्याचं उत्तर भविष्यात ते मंत्रिपदावर राहिले किंवा नाही राहिलेत त्याचं उत्तर द्यावं लागेल. सातपुडा बंगल्यावर खंडणीसंदर्भात बैठक झाली होती की नाही? याच उत्तर धनंजय मुंडेंना द्यावं लागेल” असं सुरेश धस म्हणाले.