IND vs AUS SF : उपांत्य फेरीसाठी रोहित शर्माने या खेळाडूंवर टाकला विश्वास, अशी आहे प्लेइंग 11
GH News March 04, 2025 05:12 PM

भारताकडून टॉस हरण्याची परंपरा आजच्या सामन्यातही कायम राहिली. सलग 14व्यांदा भारतीय संघाने नाणेफेकीचा कौल गमावला आहे. रोहित शर्माची ही 11 वी वेळ आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतापुढे कांगारुंना कमी धावांवर रोखण्याचं आव्हान असणार आहे.  यावेळी काय प्लेइंग 11 सह भारतीय संघ मैदानात उतरणार याची उत्सुकता होती. रोहित शर्माने यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेइंग 11 वरच विश्वास टाकला आहे. न्यूझीलंडला रोखण्यात या प्लेइंग 11 ला यश आलं होतं.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी टी20 आणि वनडे बाद फेरीच्या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. आतापर्यंत दोन्ही संघात 7 सामने झाले आहेत. यात 4 सामने भारताने आणि 3 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.

कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, मी दोन्ही परिस्थितींचा सामना करण्यासाठी तयार होतो. जेव्हा तुम्ही गोंधळलेले असता तेव्हा नाणेफेक गमावणे चांगले असे. खेळपट्टीचे स्वरूप बदलत राहते. तुम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागेल. आम्ही तिन्ही सामन्यांमध्ये चांगले क्रिकेट खेळलो आहोत आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करू. हे आव्हानात्मक असणार आहे. आम्ही त्याच संघासोबत खेळत आहोत. आम्हाला जिथे सोडले होते तिथून पुढे जायचे आहे. आता आम्ही प्रथम गोलंदाजी करत आहोत, आम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि त्यांना शक्य तितक्या कमी धावांपर्यंत मर्यादित ठेवावे लागेल.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. पृष्ठभाग खूपच कोरडा दिसतोय. खेळाडूंना चांगली भागीदारी करावी लागेल. आता टर्न लागेल. भारत ही खूप चांगली टीम आहे. दोन बदल केले आहेत. शॉर्टसाठी कूपर कॉनोली, जॉन्सनसाठी संघाचा समावेश आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, तनवीर संघा.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.