भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चॅम्पियम्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा सेमीफायनल सामना ४ मार्च रोजी खेळला गेला.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक हरली. रोहितने सलग ११ वेळा वनडेत नाणेफेक हरली आहे.
त्यामुळे रोहितने वनडेत सर्वाधिकवेळा सलग नाणेफेक हरणाऱ्या कर्णधारांमध्ये तो दुसऱ्यास क्रमांकावर आला आहे, त्याने याबाबत नेदरलँड्सच्या पीटर बोरेनची बरोबरी केली आहे.
बोरेननेही २०११ ते २०१३ दरम्यान सलग ११ वनडेत कर्णधार म्हणून नाणेफेक हरली होती.
या अनोख्या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर वेस्ट इंडिजचे ब्रायन लारा आहेत. त्यांनी १९९८ ते १९९९ दरम्यान सलग १२ वेळा वनडेत कर्णधार म्हणून नाणेफेक हरली होती.
याशिवाय भारतीय संघाने वनडेत एकूण सलग १४ वेळा नाणेफेक हरली आहे.
२०२३ वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापासून एकदाही भारतीय संघाने वनडेत नाणेफेक जिंकलेली नाही.
त्यामुळे सलग १४ वनडे सामन्यात एखाद्या संघाने नाणेफेक हरण्याची ही पहिलीच वेळ आहे.