rat४p१४.jpg-
२५N४९०३२
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील नामदेव सुवरे यांचा सत्कार करताना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन.
---
सेवानिवृत्त नामदेव सुवरे यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत नामदेव सुवरे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सुवरे यांचा सत्कार केला.
त्यांनी आपल्या २९ वर्षाच्या सेवाकाळातील कार्याचा लेखाजोखा मांडला. त्यांना आदर्श शिक्षकेतर पुरस्काराने सन्मानित केले. संतोष जाधव, डॉ. तुळशीदास रोकडे, संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले.