टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात विजयी आव्हानचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. विराटने चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटने 25 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अॅडम झॅम्पाला चौकार ठोकला. विराटने यासह एकदिवसीय कारकीर्दीतील 74 वं अर्धशतक झळकावलं. किंग कोहली याने अर्धशतकी खेळीसह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.
विराटने 53 बॉलमध्ये 94.34 च्या स्ट्राईक रेटने 4 चौकारांसह हे अर्धशतक पूर्ण केलं. विराटने यासह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याच्या विक्रमाची बरोबरी केली. स्टीव्हन स्मिथ याने याच सामन्यात टीम इंडियाविरुद्ध 73 धावांची खेळी केली. स्मिथची ही आयसीसी वनडे नॉकआऊटमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याची पाचवी वेळ ठरली. विराटने त्यानंतर आता काही तासांनीच स्टीव्हनच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटची ही आयसीसी वनडे नॉकआऊटमधील 50 पेक्षा अधिक धावा करण्याची पाचवी वेळ ठरली. सचिन तेंडुलकरच्या नावावर आयसीसी वनडे नॉकआऊटमध्ये सर्वाधिक 6 वेळा 50 पेक्षा अधिक धावांच्या विश्व विक्रमाची नोंद आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), कूपर कॉनोली, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झॅम्पा आणि तनवीर संघा.
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.